(Source: ECI/ABP News/ABP Majha)
टाटा, बिर्ला आणि रिलायन्सला बँकिंग क्षेत्रात 'नो एन्ट्री'; RBI ने मागणी फेटाळली
Tata, Birla and Reliance: टाटा, बिर्ला आणि रिलायन्स या उद्योगसमूहांना सध्यातरी बँकिंग क्षेत्रात प्रवेश मिळणार नसल्याचं आरबीआयने स्पष्ट केलं आहे.
मुंबई : टाटा, रिलायन्स आणि बिर्ला ग्रुपच्या उद्योग विस्ताराच्या स्वप्नावर पाणी फेरण्याची शक्यता आहे. टाटा, रिलायन्स आणि बिर्ला ग्रुपने बँकिग सेक्टरमध्ये येण्याची परवानगी मागितली पण आरबीआयनं (RBI) म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ही मागणी फेटाळल्याची माहिती आहे. औद्योगिक घराण्यांना कमर्शिअल बँका चालवता येणार नाही अशी भूमिका सध्यातरी आरबीआयने घेतली आहे.
काय आहेत आरबीआयचे नियम?
बँका चालवण्यासाठी एक हजार कोटींचं भांडवल आणि 26 टक्के भागिदारी ही मूळ मालकांकडे म्हणजे प्रमोटर्सकडे असणं गरजेचं आहे. ती आधी 15 टक्के इतकी होती. त्यानुसार आरबीआयच्या एका इंटर्नल वर्किंग कमिटीनं दिलेल्या 33 सल्ल्यांपैकी 21 सल्ले आरबीआयनं स्वीकारले आहेत आणि याच सल्ल्यानुसार आता टाटा रिलायन्स आणि बिर्ला समूहाला बँकिंग क्षेत्रात पाऊल ठेवता येणार नाही.
अशा औद्योगिक घराण्यांशी संबंधित कंपन्या बँकिंग क्षेत्रात यायला राजकीय नेत्यांसह काही माजी बँकर्सचाही विरोध असल्याचं दिसून येतंय. तर एनबीएफसीसाठी देखील कठोर नियम केले जाणार असल्याची माहिती यावेळी आरबीआयनं दिलीय. यामुळे टाटा, बिर्लासारख्या बड्या उद्योगांना बँकिंग व्यवसाय सुरु करण्याच्या स्वप्नावर पाणी फेरण्याची शक्यता आहे.
गैर-बँकिंग वित्तीय कंपन्यांना नियंत्रित करणाऱ्या नियमांना बँकांच्या नियमांप्रमाणे कडक करण्याची घोषणा आरबीआयने केली आहे. तसेच पेमेंट बँकांचे रुपांतर छोट्या बँकांमध्ये करण्याची मागणी आरबीआयने नाकारली आहे. याचा परिणाम पेटीएमवर होणार आहे.
संबंधित बातम्या :
- Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सीचे मार्केट सावरलं! किंमतीमध्ये सरासरी 10 टक्क्यांची वाढ
- Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सीचा प्रकार म्हणजे चीट फंड सारखा, लवकरच फुगा फुटणार; रघुराम राजन यांचा इशारा
- PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते RBI च्या दोन योजनांचा शुभारंभ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha