एक्स्प्लोर

RBI Launches UDGAM : बातमी कामाची! रिझर्व्ह बँकेने लाँच केले 'उद्गम' वेब पोर्टल; 'असा ' होणार तुमचा फायदा

RBI Launches UDGAM : विविध बँकांमध्ये बेवारस, दावा न केलेल्या रक्कमांचे ठेवीदार, वारस शोधण्यासाठी आरबीआयने आज वेब पोर्टल लाँच केले आहे.

मुंबई देशभरातील विविध बँकांमध्ये हजारो कोटी रुपये बेवारसपणे पडून आहेत. या रक्कमांवर कोणीही दावा केला नाही. परंतु सामान्य लोकांना आपल्या अशी बँकेतील रक्कम शोधण्यासाठी रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 'उद्गम'  (UDGAM) नावाचे एक केंद्रीकृत वेब पोर्टल सुरू केले आहे (RBI Launches UDGAM For Unclaimed Deposits). या पोर्टलद्वारे कोणतीही व्यक्ती बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवी शोधू शकतात. 

RBI ने याबाबत माहिती देताना सांगितले की, गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी हे वेब पोर्टल लॉन्च केले आहे. हे पोर्टल RBI ने स्वतः विकसित केले आहे. या वेबपोर्टलच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना स्वत:च्या किंवा त्यांच्या जवळच्या आणि नातेवाईकांच्या नावाने बँकांमध्ये असलेल्या, परंतु बेवारस, हक्क नसलेल्या ठेवी शोधण्यास मदत होणार आहे. ही रक्कम एकापेक्षा जास्त बँकांमध्ये ठेवली असली तरी ठेवीदारांना याची मदत होणार आहे. 

6 एप्रिल 2023 रोजी, RBI ने दावा न केलेल्या ठेवींचा मागोवा घेण्यासाठी केंद्रीकृत वेब पोर्टल विकसित करण्याची घोषणा केली. दावा न केलेल्या ठेवींचा वाढता ट्रेंड पाहता, आरबीआयने त्यावर दावा करण्यासाठी जनजागृती मोहीमही सुरू केली आहे. रिझर्व्ह बँकेने सामान्य लोकांनी दावा न केलेल्या ठेवींवर दावा करण्यासाठी त्यांच्या संबंधित बँकांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे.

या वेब पोर्टलच्या मदतीने ठेवीदार दावा न केलेले ठेवी खाते शोधून त्यावर दावा करू शकतील किंवा त्यांच्या संबंधित बँकांना भेट देऊन ठेव खाते पुन्हा सक्रिय करू शकतील. 

आरबीआयने सांगितले की, सध्या 7 बँकांमध्ये हक्क नसलेल्या ठेवी ज्यांचे तपशील वेबसाइटवर उपलब्ध आहेत ते युजर पोर्टलला भेट देऊन ऍक्सेस केले जाऊ शकतात. इतर बँकांमध्ये जमा केलेल्या दावा न केलेल्या ठेवींचे तपशील 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत टप्प्याटप्प्याने पोर्टलवर अपलोड केले जातील. 

पहिल्या टप्प्यात या बँकांमधील ठेवीदारांना होणार फायदा 

सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर सात बॅंकांचे ठेवीदार याचा वापर करु शकतात. यामध्ये सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, डीबीएस बॅंक, धनलक्ष्मी बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक, साऊथ इंडियन बॅंक, स्टेट बॅंक आॅफ इंडियाचा समावेश आहे.  

फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या आढाव्यात, सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये जवळपास 35 हजार कोटींच्या हक्क नसलेल्या ठेवी पडून असल्याची आरबीआयने माहिती दिली आहे.  यात 10 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ चालू नसलेल्या खात्यांचा समावेश आहे.  एकट्या एसबीआयमध्ये 8 हजार 86 कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी पडून आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget