RBI: आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या भवानी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कडक निर्बंध लादले आहेत. या निर्णयानुसार, खातेदारांना आता सहा महिन्यांसाठी खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. हे निर्बंध 4 जुलै 2025 पासून लागू झाले आहेत आणि पुढील सूचना येईपर्यंत कायम राहणार आहेत.
आरबीआयने बँकिंग रेग्युलेशन कायद्यानुसार ही कारवाई केली असून बँकेची आर्थिक स्थिती डळमळीत असल्यामुळे आणि खातेदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्बंधांमुळे बँकेचा बँकिंग परवाना रद्द झालेला नाही. मात्र भविष्यात बँकेची स्थिती सुधारल्यास आरबीआय निर्बंधांमध्ये बदल करू शकते.
खातेदारांची डोकेदुखी वाढली, पुढील आदेशापर्यंत...
दरम्यान, दादर पश्चिम येथील शाखेबाहेर खातेदारांची गर्दी दिसून आली. अनेकांना अचानक पैसे काढता न आल्यामुळे अडचणीत सापडावं लागलं. बँकेचे कर्मचारी यासंबंधी स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ करत होते. घाटकोपर येथील मुख्य कार्यालयातही फोनवरून माहिती मिळवणं कठीण झालं. राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. आर्थिक स्थिती डळमळीत झाल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मुंबईतील भवानी सहकारी बँकेवर कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांनुसार बँकेच्या कोणत्याही खातेदाराला पुढील आदेश येईपर्यंत आपले पैसे काढता येणार नाहीत. हे निर्बंध 4 जुलै 2025 पासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू असतील.
RBI ची कारवाई, भवानी सरकारी बँकेवर निर्बंध
आरबीआयने बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, 1949 च्या कलमांतर्गत ही कारवाई केली आहे. बँकेच्या आर्थिक स्थितीत सातत्याने घसरण होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आरबीआयने बँकेच्या संचालक मंडळासोबत तसेच व्यवस्थापनाशी सुधारणा करण्यासाठी चर्चा केली होती. मात्र, आरबीआयच्या निर्देशांचे पालन करण्यात बँक अपयशी ठरली, त्यामुळे ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत.या निर्बंधांमुळे भवानी सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द झालेला नाही. बँकेची आर्थिक स्थिती सुधारल्यास आरबीआय हे निर्बंध शिथिल करण्याचा किंवा रद्द करण्याचा विचार करू शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
लाडक्या बहिणीही अडचणीत
या निर्बंधामुळे अनेक खातेदार अडचणीत आले आहेत. अनेक महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे अडकले आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेतील माझे पाच हजार रुपये दादर शाखेत जमा आहेत. मला अत्यावश्यक खर्चासाठी पैसे काढायचे होते, पण मला सांगण्यात आले की पैसे काढता येणार नाहीत. हे पाच हजार रुपये माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत,’ असे एका महिलेने सांगितले. या घटनेमुळे भवानी बँकेतील खातेदारांमध्ये प्रचंड नाराजी आणि चिंता आहे. सहकारी बँकांच्या आर्थिक शिस्तीबाबत आणि RBI च्या निरीक्षण भूमिकेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. बँकेने आपल्या आर्थिक बाबींमध्ये पारदर्शकता आणून ग्राहकांचा विश्वास परत मिळवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
























