एक्स्प्लोर

RBI News: RBI ची मोठी कारवाई, ICICI बँक आणि कोटक महिंद्रा बँकांना ठोठावला 16.14 कोटींचा दंड

RBI News: गेल्या आठवड्यात आरबीआयनं आरबीएल बँक, युनिव्ह बँक आणि बजाज फायनान्सवर दंड ठोठावला होता. आता या बड्या खासगी बँकांवर कारवाई करण्यात आली आहे.

RBI Fines ICICI Bank & Kotak Mahindra Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserve Bank of India) आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) या दोन्ही खाजगी क्षेत्रातील बँकांवर दंड ठोठावला आहे. RBI नं ICICI बँकेला 12.19 कोटी रुपये आणि कोटक महिंद्रा बँकेला 3.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

दंड आकारणीबाबत माहिती देताना आरबीआयनं सांगितलं की, रेग्युलेटरी नियमांचं पालन न केल्यामुळे या दोन्ही बँकांवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. RBI नं ICICI बँकेला 12.19 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. कर्ज आणि अॅडव्हान्सशी संबंधित बँकांकडून निर्बंध आणि फसवणूक वर्गीकरण, तसेच अहवालाशी संबंधित नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर हा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, फायनान्शिअल सर्विसेस प्रदान करताना कमर्शियल बँका आणि निवडक फायनान्शिअल इंस्टीट्यूशनच्या वतीनं फसवणूक वर्गीकरण आणि अहवाल देण्यामध्ये RBI च्या सुचनांचं पालन न केल्याबद्दल RBI नं ICICI बँकेवर दंड ठोठावला आहे.

RBI नं कोटक महिंद्रा बँकेला 3.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याची घोषणाही केली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेनं परिपत्रक जारी करून सांगितलं की, आर्थिक सेवांच्या आउटसोर्सिंगमध्ये जोखीम व्यवस्थापन आणि आचारसंहितेशी संबंधित सुचनांचं पालन न केल्याबद्दल कोटक महिंद्रा बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई बँकेनं नामनिर्देशित केलेल्या रिकव्हरी एजंटमधील (Designated Recovery Agent) कमतरता, ग्राहक सेवा आणि कर्ज, तसेच, आगाऊ तरतुदींशी देखील संबंधित आहे. बँकेचं वैधानिक लेखापरीक्षण 31 मार्च 2022 रोजी बँकेच्या आर्थिक स्थितीच्या आधारे करण्यात आलं आहे. 

सर्विस प्रोवायडर वार्षिक आढावा घेण्यात बँक अपयशी ठरल्याचं आरबीआयला आढळलं. संध्याकाळी 7 नंतर आणि सकाळी 7 वाजण्यापूर्वी ग्राहकांशी संपर्क साधला गेला नाही, याची खात्री करण्यातही ते अपयशी ठरले. अटींच्या विरोधात, लोन डिस्बर्समेंटच्या वास्तविक तारखेऐवजी वितरणाच्या देय तारखेपासून व्याज आकारलं गेलं आहे. तसेच, लोन अॅग्रीमेंटमध्ये फोरक्लोजर चार्जेसची तरतूद नसतानाही फोरक्लोजर चार्जेस लावण्यात आले आहेत.

RBI च्या म्हणण्यानुसार, दोन्ही प्रकरणांमध्ये दंड आकारण्याचं पाऊल नियामक तरतुदींचं पालन न केल्याबद्दल बँकांकडून उचलण्यात आलं आहे आणि यामागील हेतू कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या ग्राहकांसह बँकेच्या वैधतेवर कोणताही निर्णय देणं नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Jio Financial Services Q2 Earnings: जिओ 'धन धना धन'; मुकेश अंबानींच्या कंपनीची कमाल, बाजारात एन्ट्री घेताच धमाल; दुप्पट नफा, शेअर्सही सुसाट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar & Sanjay Raut: संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल, नातू ढाल म्हणून पुढे सरसावला, भाजपला वादात खेचलं
संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल, नातू ढाल म्हणून पुढे सरसावला, भाजपला वादात खेचलं
Nashik Crime : नाशिकमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ, घातपाताचा संशय, मृतदेहाजवळ आढळली दारूची बाटली अन् ग्लास
नाशिकमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ, घातपाताचा संशय, मृतदेहाजवळ आढळली दारूची बाटली अन् ग्लास
Sanjay Raut : शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी शरद पवारांना सुनावले खडेबोल; आता शिंदे गटाची राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले...
शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी शरद पवारांना सुनावले खडेबोल; आता शिंदे गटाची राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले...
Maharashtra Politics: शरद पवारांकडून एकनाथ शिंदेंचा सत्कार; सुषमा अंधारे म्हणाल्या, जे व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना...
शरद पवारांकडून एकनाथ शिंदेंचा सत्कार; अंधारे म्हणाल्या, जे व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Kolhe on Sanjay Raut | शरद पवारांची ही वैयक्तिक भूमिका, अमोल कोल्हेंचे राऊतांना उत्तरABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11AM 12 February 2025Uddhav Thackeray on Sharad Pawar | पवारांनी शिंदेंचा सत्कार केल्यानंतर उद्धव ठाकरेंची तीव्र नाराजीSanjay Raut Full PC | पवारांकडून शिंदेंचा सत्कार, ठाकरे गट आक्रमक, संजय राऊतांनी खडेबोल सुनावले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar & Sanjay Raut: संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल, नातू ढाल म्हणून पुढे सरसावला, भाजपला वादात खेचलं
संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल, नातू ढाल म्हणून पुढे सरसावला, भाजपला वादात खेचलं
Nashik Crime : नाशिकमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ, घातपाताचा संशय, मृतदेहाजवळ आढळली दारूची बाटली अन् ग्लास
नाशिकमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ, घातपाताचा संशय, मृतदेहाजवळ आढळली दारूची बाटली अन् ग्लास
Sanjay Raut : शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी शरद पवारांना सुनावले खडेबोल; आता शिंदे गटाची राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले...
शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी शरद पवारांना सुनावले खडेबोल; आता शिंदे गटाची राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले...
Maharashtra Politics: शरद पवारांकडून एकनाथ शिंदेंचा सत्कार; सुषमा अंधारे म्हणाल्या, जे व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना...
शरद पवारांकडून एकनाथ शिंदेंचा सत्कार; अंधारे म्हणाल्या, जे व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना...
VIDEO : सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा अंदाज बदलला, साडीमध्ये ग्लॅमरस अदा दाखवतानाचा व्हिडीओ चर्चेत
सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा तोरा बदलला, साडीमधील ग्लॅमरस अंदाजातील व्हिडीओ चर्चेत
Rohit Sharma : मॅचविनर जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर, रोहित शर्मा समोर नवा पेच, 'त्या' तिघांपैकी कुणावर विश्वास दाखवणार?
जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर, रोहित शर्मा समोर नवा पेच, गोलंदाजीची धुरा कुणाकडे देणार?
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
Embed widget