एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा फटका अनेक योजनांना बसत असल्याचे दिसून येत आहे.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फटका अनेक योजनांना बसत असल्याचे दिसून येत आहे. आता या योजनेचा फटका शेतकऱ्यांनाही बसतोय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेसाठी दिलं जाणार अनुदान गेल्या वर्षभरापासून मिळालेलेच नाही. एकट्या छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात शेतकऱ्यांची (Farmers) शासनाकडे पाच कोटी 60 लाख रुपये सरकारकडे बाकी आहे. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान मिळते, म्हणून या योजनेत सहभाग घेतला होता. शेतीत ठिबक योजनेसाठी स्वतःच्या खिशातून शेतकऱ्यांनी पैसे घातले. सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचे पैसे मागण्यासाठी शेतकरी कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवतात. मात्र, त्यांना त्यांच्या हक्काचे सबसिडीचे पैसे मिळत नसल्याची स्थिती उद्भवली आहे. 

लाडकी बहीण योजनेचा इतर योजनांना फटका बसत असल्याने विरोधकांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. लाडकी बहीण योजनेमुळे शिवभोजन सारख्या योजना बंद करायला लागल्याचा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावलाय. तर लाडकी बहीण योजना बहिणींसाठी नाही तर सत्तेसाठी होती, असे म्हणत माजी आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणाऱ्या महिलांच्या नावाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. 

आम्ही लाडक्या बहि‍णींच्या बाजूने : जयंत पाटील 

जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, लाडकी बहीण योजनेतून 5 लाखाच्या आसपास महिलांची नावे कमी झाली आहेत. महिलांना एकदा पैसे दिले की दिले. त्या पैशावर महिलांनी मते देखील दिले. पण आता काही महिलांना या योजनेतून वगळत आहे हे सरकार चुकीचं करतेय. पैसे देताना सरकारने बघूनच पैसे द्यायला हवे होते. पैसे न बघता दिल्यावर आता पैसे थांबवता येणार नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिनींना मिळणारे पैसे मिळालेच पाहिजे. त्यामुळे आम्ही लाडक्या बहिणींच्या बाजूने उभे आहोत. ज्या महिलांनी मतदान केलं त्या महिलांची आता फसवणूक झाली असं त्या महिलांना वाटू नये, असे म्हणत जयंत पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारला टोला लगावलाय.

लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावाकडे दुर्लक्ष करू नका

दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महायुती सरकारने लाडका भाऊ योजनेच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत लाखाहून जास्त प्रशिक्षणार्थी राज्यातील विविध कार्यालयात नेमले होते. आता त्यांचे सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना कामावरून कमी केले जात आहे. त्यामुळे राज्यातील सर्व प्रशिक्षणार्थींवर पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णीसाठी लाडक्या भावाकडे दुर्लक्ष करू नका, असे  आवाहन करण्यासाठी आज सांगलीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी तरुणांचा राज्यव्यापी मेळावा पार पडतोय. या प्रशिक्षणार्थींना न्याय मिळावा या मागणीसाठी व आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सांगलीत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेय. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तथा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख हभप तुकाराम बाबा महाराज यांनी या मेळाव्यात पुढाकार घेतलाय.

आणखी वाचा 

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 'दे धक्का'! अपात्र महिलांची नावे वगळण्यास सुरुवात, चारचाकीवाल्यांच्या घरी जाऊन सर्व्हे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget