RBI : देशातील 'या' मोठ्या सरकारी बँकेवर आरबीआयची कारवाई; लाखो ग्राहकांवर होणार परिणाम
RBI Action Against Bank of Baroda : आरबीआयने देशातील सर्वात महत्त्वाच्या सरकारी बँकेवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
![RBI : देशातील 'या' मोठ्या सरकारी बँकेवर आरबीआयची कारवाई; लाखो ग्राहकांवर होणार परिणाम RBI directs Bank of Baroda to suspend further customer onboarding on bob World mobile app RBI : देशातील 'या' मोठ्या सरकारी बँकेवर आरबीआयची कारवाई; लाखो ग्राहकांवर होणार परिणाम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/10/eb939ed5894d6eb74e87b51a0a1e13141696941506810290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने (RBI) देशातील सर्वात महत्त्वाच्या सरकारी बँकेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे ग्राहकांवर थेट परिणाम होणार आहे. आरबीआयने बँक ऑफ बडोदावर (Bank Of Baroda) कारवाई केली आहे.
बँक ऑफ बडोदाला (BoB) त्यांच्या मोबाईल अॅप 'BoB वर्ल्ड' वर नवीन ग्राहक जोडण्यास तात्काळ प्रभावाने मनाई केली आहे. याचा अर्थ आता नवीन ग्राहक BoB च्या अॅपचा वापर करू शकणार नाही. 'बँक ऑफ बडोदा'च्या जुन्या ग्राहकांवर याचा परिणाम होणार नाही. रिझर्व्ह बँकेने 'बॉब वर्ल्ड'च्या जुन्या ग्राहकांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेण्याची सूचना बँकेला केली आहे.
कोणत्या ग्राहकांवर होणार परिणाम?
याचा परिणाम बँक ऑफ बडोदाच्या त्या ग्राहकांवर होईल ज्यांचे बँकेत खाते आहे पण ते 'बॉब वर्ल्ड' अॅपशी जोडलेले नाहीत. इंटरनेट बँकिंग व्यतिरिक्त, बँकेच्या या अॅपवर युजर्सना युटिलिटी संबंधित पेमेंट, तिकिटे, IPO सबस्क्रिप्शन इत्यादी सुविधा मिळतात.
आरबीआयने काय म्हटले?
रिझर्व्ह बँकेने सांगितले की, अॅपवर ग्राहक जोडले जाताना काही त्रुटी आढळल्या. ही चिंतेची बाब होती. आरबीआयने म्हटले की, भारतीय रिझर्व्ह बँकेने, बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करून, बँक ऑफ बडोदाला 'बॉब वर्ल्ड' वर अधिक ग्राहक जोडण्याची प्रक्रिया निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. मोबाइल अॅपची सेवा तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आली आहे. नवीन ग्राहक अॅपशी जोडताना या त्रुटींवर मात करणे आवश्यक आहे. आरबीआयचे समाधान झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे आरबीआयने म्हटले.
महाराष्ट्रातील 113 वर्ष जुन्या सहकारी बँकेची मान्यता रद्द
अहमदनगर (Ahmednagar) शहरातील 113 वर्षांपेक्षा जास्त वर्षांची गौरवशाली परंपरा असलेली आणि जिल्ह्यातील मोठी सहकारी बँक असलेल्या नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेचा (Nagar Urban Co-operative Bank) परवाना भारतीय रिझर्व बँकेने रद्द केला आहे. 5 ऑक्टोबरपासून बँकेचे कामकाज थांबवण्यात आले. बँकिंग व्यवसाय करण्यासाठी अर्बन बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईच्या संधी नाहीत. यामुळे बँकिंग नियमन कायदा 1949 चे कलम 56 च्या तरतुदींचे पालन होत नाही. अशा स्थितीत बँक सुरू ठेवणे तिच्या ठेवीदारांच्या हिताच्या दृष्टीने चांगले नाही असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)