एक्स्प्लोर

रतन टाटांचं आणखी एक स्वप्न पूर्ण, 165 कोटी रुपये खर्च करुन प्राण्यांसाठी उभारलं रुग्णालय 

Ratan Tata: रतन टाटा यांनी 165 कोटी रुपये खर्च करून प्राण्यांसाठी रुग्णालय (Animal Hospital) बांधलं आहे. हे रुग्णालय रतन टाटांना नेमकं का बांधलं? यामगची नेमकी स्टोरी काय? पाहुयात सविस्तर माहिती. 

Ratan Tata: देशातील बड्या उद्योगपतींपैकी एक नाव म्हणजे रतन टाटा (Ratan Tata) . टाटा समूह सातत्याने समाज कल्याणासाठी विविध योजना राबवत असते. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून विविध समाजउपयोगी कामं केली जातात. असंच एक समाजउपयोगी काम रतन टाटा यांनी केलं आहे. रतन टाटा यांनी 165 कोटी रुपये खर्च करून प्राण्यांसाठी रुग्णालय (Animal Hospital) बांधलं आहे. हे रुग्णालय रतन टाटांना नेमकं का बांधावे असं वाटलं? यामगची नेमकी स्टोरी काय? पाहुयात सविस्तर माहिती. 

2.2 एकर जागेवर 24 तास चालणारे प्राणी रुग्णालय 

देशातील लोकप्रिय उद्योगपती रतन टाटा यांनी त्यांचा आणखी एक आवडता प्रकल्प पूर्ण केला आहे. टाटा समूह सातत्याने समाज कल्याणासाठी विविध योजना राबवत असतो. त्यांच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलने कोट्यवधी लोकांना अत्यंत कमी खर्चात कर्करोगाशी लढण्यास मदत केली आहे. त्याच धर्तीवर आता रतन टाटा 165 कोटी रुपये खर्च करून 2.2 एकर जागेवर 24 तास चालणारे प्राणी रुग्णालय सुरू करणार आहेत. मुंबईत तयार झालेले हे हॉस्पिटल सर्वांच्या मदतीसाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होणार आहे.

कुत्रा, मांजर, ससा अशा लहान प्राण्यांसाठी रुग्णालय

86 वर्षांचे रतन टाटा अनेक प्रकारच्या देणग्यांसाठी ओळखले जातात. टाटा ट्रस्टचे स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल महालक्ष्मी परिसरात सुरू होणार आहे. कुत्रा, मांजर, ससा यासारख्या लहान प्राण्यांची सेवा करण्यासाठी हे डिझाइन केले आहे. प्राणी देखील कुटुंबाचा भाग असल्याचे मत रतन टाटा यांनी व्यक्त केले. माझ्याकडे अनेक पाळीव प्राणी देखील आहेत. त्यामुळं मला या रुग्णालयाची नितांत गरज भासली. आता माझे स्वप्न पूर्ण होताना पाहून मला खूप आनंद होत असल्याचे रतन टाटा म्हणाले. 

माझ्या कुत्र्यावर अमेरिकेत उपचार करावे लागले

दरम्यान, रतन टाटांनी त्यांच्यासोबत घडलेला एक प्रसंग देखील सांगितला आहे. रतन टाटांचा कुत्रा आजारी पडला होता. यावेळी ज्वॉइंट रिप्लेसमेंटसाठी रतन टाटा यांच्या कुत्र्यावर अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठात उपचार करावे लागले होते. अमेरिकेती डॉक्टरांनी रतन टाटा यांच्या लाडक्या पाळीव प्राण्यावर शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर मुंबईतही जागतिक दर्जाचे पशु रुग्णालय असावे, असा विचार त्यांच्या मनात आला होता. आता त्या रुग्णालयाचे काम पूर्ण होत असून, रतन टाटांचे आणखी एक स्वप्न पूर्ण झालं आहे. 

टाटा समूहाने निर्माण केलेल्या प्रसिद्ध संस्था 

टाटा समूहाच्या सर्वोत्तम संस्थांमध्ये या रुग्णालयाची गणना केली जाईल. याआधी या व्यावसायिक घराने देशातील पहिले कॅन्सर केअर हॉस्पिटल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस - बंगळुरु सारख्या नामांकित संस्था देखील सुरू केल्या आहेत. हे रुग्णालय सुरुवातीला नवी मुंबईतील कळंबोली भागात बांधले जाणार होते. मग प्रवासात लागणारा वेळ लक्षात घेऊन मुंबईतच करायचं ठरवलं. 

5 नामांकित ब्रिटीश रुग्णालयांशी टाय अप 

या रुग्णालयाची जबाबदारी ब्रिटनचे प्रसिद्ध पशुवैद्य डॉक्टर थॉमस हिथकोट यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या रुग्णालयाने रॉयल व्हेटर्नरी कॉलेज, लंडनसह 5 प्रसिद्ध ब्रिटिश रुग्णालयांशीही करार केला आहे. भटक्या कुत्र्यांच्या संगोपनासाठी एक स्वयंसेवी संस्थाही उघडण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

एकेकाळी रतन टाटा विकणार होते 'ही' कंपनी, आज ही कंपनी करतेय 2.41 लाख कोटींची उलाढाल

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
Multibagger Stock : एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget