Multibagger Stock: झुनझुनवाला यांच्या या पोर्टफोलिओ स्टॉकमध्ये 20,000 रुपये गुंतवले असते, तर झाला असता कोट्याधीश; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Rakesh Jhunjhunwala portfolio: राकेश झुनझुनवाला हे शेअर बाजारातील बिग बुल मानले जातात.
Rakesh Jhunjhunwala Portfolio: राकेश झुनझुनवाला हे शेअर बाजारातील बिग बुल मानले जातात. जर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत तुम्हीही 20 वर्षांपूर्वी टाटा समूहाच्या या शेअरमध्ये फक्त 20,000 रुपये गुंतवले असते, तर कोट्याधीश झाले असता. आम्ही टाटा समूहाची कंपनी टायटन कंपनीच्या शेअर्सबद्दल बोलत आहोत. अवघ्या 20 वर्षांत टायटनचा स्टोक 4.03 रुपयांवरून 2138 रुपयांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच दोन दशकांत टायटनने आपल्या गुंतवणूकदारांना 53,000 टक्के परतावा दिला आहे.
शेअर बाजारात एखाद्या गुंतवणूकदाराने चांगल्या ग्रुप कंपनीच्या शेअर्समध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली, तर तो शेअर गुंतवणूकदारासाठी मल्टीबॅगर ठरू शकतो. टायटन कंपनीचे शेअर्स 5 वर्षांपूर्वी कोणी विकत घेतले असते, तर त्याला 315 टक्के परतावा मिळाला असता. टायटनच्या शेअर्सने 516 रुपयांवरून 2138 रुपयांपर्यंतचा प्रवास केला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी टायटनचे शेअर्स खरेदी केले असते, तर त्याला 870 टक्के परतावा मिळाला असता. एका दशकात हा शेअर 221 रुपयांवरून 2138 रुपयांपर्यंत गेला आहे. तसेच 20 वर्षांत स्टॉकने गुंतवणूकदारांना 530 पट परतावा मिळून दिला आहे. या काळात टायटनचा शेअर 4.03 रुपयांवरून 2138 रुपयांवर गेला आहे.
10,000 रुपयांचे 53 लाख झाले
जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी टायटनच्या स्टॉकमध्ये 10,000 रुपये गुंतवले असते, तर तुमची गुंतवणूक 53 लाख रुपये झाली असती. राकेश झुनझुनलाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला या दोघांची टायटन कंपनीत गुंतवणूक केली आहे. ज्यामध्ये राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे एकूण 3,53,10,395 शेअर्स आहेत. जे एकूण कंपनीच्या शेअरहोल्डिंगच्या 3.98 टक्के आहेत. तर रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 95,40,575 शेअर्स आहेत, ज्यात 1.07 टक्के हिस्सा आहे. म्हणजेच पती-पत्नी दोघांची मिळून टायटनमध्ये 5.05 टक्के भागीदारी आहे.
दरम्यान, टायटनच्या स्टॉकने 2022 मध्ये गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. या कालावधीत शेअरची किंमत 15 टक्क्यांनी घसरली आहे. महागाई, रशिया-युक्रेन युद्ध आणि महागडे कर्ज यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून त्याचा परिणाम टायटनच्या शेअरवरही झाला आहे.
महत्वाची सूचना: (येथे दिलेली बातमी केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आली आहे. येथे नमूद करणे महत्त्वाचे आहे की, बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदार म्हणून पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.)