एक्स्प्लोर

अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरुन राहल गांधींचा हल्लाबोल

केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (PMUY) अनुदानित एलपीजी सिलिंडरची वार्षिक मर्यादा नऊवरून चारवर आणली आहे. यावरुन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केलीय.

Rahul Gandhi on PMUY:  केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (PMUY) अनुदानित एलपीजी सिलिंडरची वार्षिक मर्यादा नऊवरून चारवर आणली आहे. यावरुन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी मोदी सरकारच्या (Modi Govt)  आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांवर टीका केली. 12 वर्षांच्या गरीब-विरोधी आर्थिक धोरणांमुळे आणि तडजोडीच्या परराष्ट्र धोरणामुळे देश अशा परिस्थितीत येऊन पोहोचला आहे, जिथे लाखो गरीब कुटुंबे आणि महिलांना विषारी लाकडाचा धूर श्वासावाटे आत घेण्यास भाग पडत आहे.

घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 89 रुपयांची वाढ

काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, उज्ज्वला योजनेअंतर्गत अनुदानित सिलेंडरची संख्या नऊवरून चारवर आणली आहे. इतकेच नाही, तर गेल्या तीन महिन्यांत घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 89 रुपयांची वाढ केली आहे. याचा अर्थ, आधी किंमत वाढवा, मग अनुदान कमी करा आणि गरिबांच्या चुली विझवा. स्थलांतरित मजुरांची जीवनरेखा असलेल्या 5 किलोच्या सिलेंडरच्या दरात 323 रुपयांची वाढ केली आहे. ते काय कमावणार, काय खाणार आणि काय वाचवणार?

स्वतःच्या अपयशाचे बिल गरिबांच्या माथी मारणे हे मोदींचे लुटीचे मॉडेल 

अब्जाधीश मित्रांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करणे आणि स्वतःच्या अपयशाचे बिल गरिबांच्या माथी मारणे हे मोदींचे लुटीचे मॉडेल असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. मोदीजी, तुमच्या अपयशाचा भार फक्त गरीबच उचलणार का? तुम्ही निर्माण केलेल्या या ढासळत्या अर्थव्यवस्थेची किंमत कामगार, शेतकरी, महिला आणि मध्यमवर्ग चुकवणार का? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. 

केंद्र सरकारने अनुदान का कमी केले?

पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत (पीएम-उज्ज्वला योजना) अनुदानात कपात करण्यासंदर्भात, सरकारने सांगितले की हा बदल सरासरी घरगुती वापर लक्षात घेऊन करण्यात आला आहे. 2016 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत, लाभार्थ्यांना पूर्वी दरवर्षी प्रत्येकी 14.2 किलोचे 12 अनुदानित सिलिंडर मिळत होते. गेल्या वर्षी अनुदानित सिलिंडरची संख्या नऊवर आणण्यात आली होती आणि आता ती आणखी कमी करून चार करण्यात आली आहे. मे 2022 मध्ये, सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रति सिलेंडर 200 चे अनुदान सुरू केले, जे नंतर ऑक्टोबर 2023 मध्ये वाढवून 300 करण्यात आले. हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. मध्य-पूर्वेतील संकटाच्या काळात, आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या आणि एलपीजीच्या किमतींमध्ये तीव्र चढ-उतार झाला, ज्याचा परिणाम भारतावर झाला.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UPI Transaction Charges : तुमच्या यूपीआय पेमेंटवर पैसे लागणार? सरकारचे दोन नवे फॉर्म्युले; दुकानदारांवर काय होणार परिणाम?
तुमच्या यूपीआय पेमेंटवर पैसे लागणार? सरकारचे दोन नवे फॉर्म्युले; दुकानदारांवर काय होणार परिणाम?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
Advertisement

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget