एक्स्प्लोर

दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 

एका बाजूला देशातील श्रीमंत अधिकच श्रीमंत होताना दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला गरीब अधिक गरीब होताना दिसत आहे. गरीब आणि श्रीमंतांमध्ये मोठी दरी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Indias most valuable family Businesses News : एका बाजूला देशातील श्रीमंत अधिकच श्रीमंत होताना दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला गरीब अधिक गरीब होताना दिसत आहे. गरीब आणि श्रीमंतांमध्ये मोठी दरी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एका अहवालानुसार देशातील 300 व्यवसायिक कुटुंबाचे एकत्रीत मूल्य 138 लाख कोटी रुपये आहे. गेल्या वर्षभरात या व्यवसायिकांनी 30 लाख कोटी रुपयांची भर घातली आहे. गेल्या दोन वर्षापासून हे व्यवसायिक दररोज 4 हजार 76 कोटी रुपयांची कमाई करत आहेत. जाणून घ्या सविस्तर माहिती. 

अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब 

अहवालानुसार अंबानी कुटुंब हे देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे.  रिलायन्स इंडस्ट्रीजमुळे, या कुटुंबाचे मूल्यांकन अदाजे 25.82 लाख कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी त्याच्या मूल्यात 8.5 टक्क्यांनी घट झालीय. या घसरणीनंतरही, अंबानी कुटुंब यादीतील इतर सर्वांपेक्षा खूप पुढे आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कुमार मंगलम बिर्ला कुटुंबाचे मूल्यांकन 8.14 लाख कोटी रुपये आहे. कुमार मंगलम बिर्ला कुटुंबांची संपत्ती 26 टक्क्यांनी वाढून 8.14 लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याने दुसऱ्या स्थानावर आहे. जिंदाल कुटुंबांची संपत्ती 40 टक्क्यांनी वाढून 8.02 लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याने ते तिसऱ्या स्थानावर आहेत. दरम्यान, बजाज कुटुंब 7.7 लाख कोटी रुपयांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यांच्या संपत्तीत 3.9 टक्क्यांनी घट झाली आहे. महिंद्रा कुटुंब 5.15 लाख कोटी रुपयांसह पाचव्या स्थानावर आहे, ज्यात 5.4 टक्क्यांची घट झाली आहे.

300 कुटुंबांच्या एकूण संपत्तीपैकी 51 टक्के संपत्ती पहिल्या 10 कुटुंबांची 

अहवालानुसार, अंबानी, बिर्ला आणि जिंदाल या पहिल्या तीन कुटुंबांची एकत्रित संपत्ती अंदाजे 42 लाख कोटी रुपये आहे, जी भारताच्या एकूण सूचीबद्ध बाजार भांडवलाच्या अंदाजे 9 टक्के आहे. संपत्तीचे केंद्रीकरण क्रमवारीत तळाशीही स्पष्टपणे दिसून येते. यादीतील 300 कुटुंबांच्या एकूण संपत्तीपैकी 51 टक्के संपत्ती पहिल्या 10 कुटुंबांची आहे.

१ अब्ज डॉलर्सची निव्वळ संपत्ती असलेली 230 कुटुंबे

दरम्यान, देशात अब्जाधीश कौटुंबिक व्यवसायांची संख्याही वेगाने वाढलीय. अहवालानुसार, आता 230 कुटुंबांची निव्वळ संपत्ती 1 अब्ज डॉलर्स किंवा त्याहून अधिक आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 48 टक्क्यांची वाढ आहे. अहवालात असे आढळून आले की, 300 कुटुंबांपैकी 79 कुटुंबे फॅमिली ऑफिस चालवतात, तर पहिल्या पिढीतील 36 टक्के कुटुंबांनी आधीच अशा संरचना स्थापित केल्या आहेत. यावरून असे दिसून येते की, फॅमिली ऑफिस आता भारतातील काही जुन्या औद्योगिक घराण्यांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ते नवीन उद्योजकांसाठीच्या संपत्ती व्यवस्थापन प्रणालीचाही एक महत्त्वाचा भाग बनत आहेत.

बिझनेससाठी मुंबई हे सर्वात मोठे मुख्यालय

या यादीत समाविष्ट कंपन्यांसाठी मुंबई हे सर्वात मोठे मुख्यालय राहिले आहे. या शहरात 95 कंपन्या असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्या चार अधिक आहेत. यानंतर एनसीआरमध्ये 58 आणि कोलकात्यात 26 कंपन्या आहेत. या यादीत एकूण 45 शहरांचा समावेश आहे. परंतु नवीन मालमत्तेची भौगोलिक व्याप्ती बदलू लागली आहे. 

कोणते उद्योग सर्वाधिक कौटुंबिक संपत्ती निर्माण करतायेत? 

अहवालात दिलेल्या माहितीनुसार, सर्वात जास्त कंपन्या ‘औद्योगिक उत्पादने’ क्षेत्रातील (47 कंपन्या), त्यानंतर ‘ऑटोमोबाईल्स आणि ऑटो कॉम्पोनंट्स’ आणि ‘केमिकल्स’ क्षेत्रातील आहेत, त्यापैकी प्रत्येकी 31 कंपन्या आहेत. परंतु कौटुंबिक व्यवसायाचे सर्वाधिक सरासरी मूल्य ‘मेटल्स अँड मायनिंग’ क्षेत्रातून येते, जे 84,019 कोटी रुपये आहे. त्या तुलनेत, यादीत समाविष्ट असलेल्या ‘खाद्य आणि पेये’ व्यवसायांचे सरासरी मूल्य 12714 कोटी रुपये आहे.

या आकडेवारीवरून असे दिसून येते की, भारतातील नवीन संपत्ती केवळ तंत्रज्ञान किंवा ग्राहक व्यवसायांपुरती मर्यादित नाही. औषधनिर्माण, उत्पादन, धातू, औद्योगिक उत्पादने आणि रिअल इस्टेट यांसारखी पारंपरिक क्षेत्रेदेखील लक्षणीय संपत्ती निर्माण करत आहेत.

या कुटुंबांच्या संपत्तीत घट

एचसीएल टेक्नॉलॉजीजशी संबंधित असलेल्या नाडर कुटुंबाच्या संपत्तीत तीन वर्षांतील सर्वात मोठी घट दिसून आली, ज्यात 32 टक्के म्हणजे 1.39 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. राजीव सिंग कुटुंबाच्या संपत्तीत 25 टक्के घट झाली असून, ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सॉफ्टवेअर आणि सेवा तसेच स्थावर मालमत्ता (रिअल इस्टेट) या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक घट झाली. ताज्या क्रमवारीनुसार, नाडर कुटुंबाची संपत्ती 2.91 लाख कोटी असल्याचा अंदाज आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत 38 टक्के घट आहे, तर प्रेमजी कुटुंबाची संपत्ती 2.72 लाख कोटी असून, त्यात 2.3 टक्के घट झाली आहे.

हे व्यवसाय किती रोजगार देतात?

ही 300 कुटुंबे मिळून 54 लाखांहून अधिक लोकांना रोजगार देतात, अंदाजे 56 लाख कोटींचा महसूल मिळवतात. तर 5.6 लाख कोटींचा निव्वळ नफा नोंदवतात, ज्यामुळे एकत्रित निव्वळ नफ्याचे प्रमाण (नेट मार्जिन) अंदाजे 10 टक्के होते. अहवालानुसार, त्यांनी कराच्या स्वरूपात अंदाजे 1.9 लाख कोटी रुपयांचे योगदान दिले, जे भारताच्या कॉर्पोरेट कर संकलनाच्या सुमारे 17 टक्के आहे. 

व्यवसायात महिलांचा सहभाग अधिक वाढतोय

महिलांची भूमिका हळूहळू वाढत आहे. व्यवसायात त्यांची उपस्थिती वाढत आहे. या यादीत महिलांच्या नेतृत्वाखालील 18 कंपन्यांचा समावेश आहे. हिंदुस्तान झिंकच्या प्रिया अग्रवाल हेब्बर या सर्वात श्रीमंत महिला व्यवसायिक आहेत. त्यांच्या कंपनीचे मूल्य 4.45 लाख कोटी आहे. त्यानंतर एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या रोशनी नाडर मल्होत्रा  2.91 लाख कोटी आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Success Story :  सलग सहा वेळा अपयश आलं, पण सातव्या प्रयत्नात यशाचं शिखर गाठलं, लेफ्टनंट होण्याचं स्वप्न पूर्ण झालं
Success Story :  सलग सहा वेळा अपयश आलं, पण सातव्या प्रयत्नात यशाचं शिखर गाठलं, लेफ्टनंट होण्याचं स्वप्न पूर्ण झालं
आता बचत खात्यांवरही मिळणार मोठा फायदा! 'या' बँकांकडून व्याजदर वाढ, तुमचं खातं कोणत्या बँकेत? 
आता बचत खात्यांवरही मिळणार मोठा फायदा! 'या' बँकांकडून व्याजदर वाढ, तुमचं खातं कोणत्या बँकेत? 
कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ, पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? भारतावर काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती
मोठी बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ, पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? भारतावर काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती
Gold Silver Rate: सोने-चांदीच्या दरात किरकोळ घसरण! घसरणीमागील मुख्य कारणे समोर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
सोने-चांदीच्या दरात किरकोळ घसरण! घसरणीमागील मुख्य कारणे समोर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
Zahir Khan: झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
Embed widget