SBI vs Post office: तुम्ही RD करत असाल जाणून घ्या कुठे होईल अधिक फायदा?
Recurring Deposit interest बँकेप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्येही RD बचत योजना आहे. अनेकजण चांगल्या व्याजदरासह परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करतात.
State Bank Vs Post Office RD: बचत करण्यासाठी अनेकजण सुरक्षित बचतीचा पर्याय शोधतात. अनेकांचा कल हा सुरक्षिता आणि परतावा याकडे असतो. त्यातूनच अनेकजण RD मध्ये बचत करतात. बचतीसाठी RD हा एक चांगला पर्याय असल्याचे म्हटले जाते. RD मध्ये तुम्हाला चांगल्या व्याजासह परतावा मिळण्याची खात्री असते.
कुठे होईल फायदा?
RD मध्ये खातेदारांना निश्चित केलेल्या हप्त्यांमध्ये पैसे जमा करावे लागतात. RD ची मुदत संपल्यानंतर तुम्हाला पैसे आणि व्याजाचा फायदा मिळतो. RD सुरू करताना ठरवलेली रक्कम पुन्हा बदलता येत नाही. तुम्ही पोस्ट ऑफिस अथवा बँकेत अन्य ठिकाणी RD बचत सुरू करू शकता.
पोस्ट ऑफिस RD
तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 100 रुपयांपासून RD सुरू करू शकता. यामध्ये पैसे जमा करण्यासाठी कमाल मर्यादा नाही. जर तुमचे RDखाते महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत उघडले तर, तुम्हाला दर महिन्याच्या 15 तारखेच्या आधी पैसे जमा करावे लागतील. जर तुम्ही 15 तारखेनंतर खाते उघडले असेल तर तुम्ही महिनाखेरपर्यंत पैसे जमा करू शकता. पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत कर्जदेखील उपलब्ध होऊ शकते. पोस्ट खात्यातील RD ला 5.8 टक्के दराने व्याज मिळत आहे.
स्टेट बँक RD
स्टेट बँकेत आरडी खाते उघडल्यास सर्वसामान्यांना ५ टक्के व्याजाचा लाभ मिळेल. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना ५.४ टक्के दराने व्याज मिळणार आहे. हे व्याजदर 8 जानेवारी 2021 पासून लागू झाले आहेत. स्टेट बँकेत तुम्ही 1 वर्ष ते 10 वर्षांसाठी आरडी खाते उघडू शकता.
RD खाते कोण उघडू शकतो
18 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती आरडी योजनेत आपले खाते उघडू शकते. या योजनेत संयुक्त खातेही उघडता येते. अल्पवयीन व्यक्तीचे खाते पालकाच्यावतीने देखील उघडले जाऊ शकते. जर 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचा अल्पवयीन असेल तर त्याच्या नावावरही खाते उघडता येईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या: