एक्स्प्लोर

PM Ujjwala Yojana: उज्ज्वला योजनेकडे पाठ? 5 वर्षात चार कोटी लाभार्थ्यांनी एकदाही LPG सिलिंडर भरलाच नाही

PM Ujjwala Yojana: उज्ज्वला योजनेतील जवळपास 4 कोटी लाभार्थ्य्यांनी दुसऱ्यांदा एलपीजी गॅस सिलिंडर भरला नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

PM Ujjwala Yojana:  स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या एलपीजी गॅस सिलिंडर (LPG Gas Price) सातत्याने महाग होत असल्याने सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. आता केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या विक्रीबाबत महत्त्वाची आकेडवारी जाहीर केली आहेत. मागील पाच वर्षात उज्ज्वला योजनेतील (Pradhan Mantri Ujjwala Yojana) जवळपास 4.13 कोटी लाभार्थ्यांनी दुसऱ्यांदा गॅस सिलिंडर मागवलाच नसल्याची माहिती समोर आली आहे. 

केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी संसदेत लेखी माहिती दिली. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी सरकारला उज्जवला योजनेतील लाभार्थ्यांनी मागील पाच वर्षात एलपीजी गॅस सिलिंडर एक अथवा त्यापेक्षा कमी सिलिंडर रिफील न करणाऱ्याबाबत माहिती मागितली होती. त्याला उत्तर देताना रामेश्वर तेली यांनी सांगितले, मागील पाच वर्षात उज्ज्वला योजनेच्या 4.13 कोटी लाभार्थ्यांनी एकदाही सिलिंडर दुसऱ्यांदा भरला नाही. त्यांनी सांगितले की 7.67 कोटी लाभार्थ्यांनी फक्त एकदाच एलपीजी सिलिंडर दुसऱ्यांदा भरला.  

रामेश्वर तेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलेंडरची विक्री ही लोकांच्या आहाराच्या सवयी-पद्धती, घरात राहणारे एकूण सदस्य आणि इंधनाचे इतर पर्यायांवर अवलंबून असते. वर्ष 2021-22 मध्ये एकूण 30.53 कोटी सक्रिय एलपीजी ग्राहकांपैकी 2.11 कोटी जणांनी एलपीजी सिलिंडर दुसऱ्यांदा भरला नाही. तर, 2.91 कोटी एलपीजी ग्राहकांनी फक्त एकदाच गॅस सिलिंडर भरला आहे. 

पेट्रोलियम राज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलत राहतात आणि अनुदानाची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Embed widget