LIC New Plan: गुंतवणूक छोटी पण परतावा चांगला, एलआयसी ही योजना फायदेशीर
LIC New Jeevan Mangal Plan: छोट्या गुंतवणुकीत या चांगला परतावा एलआयसीच्या या योजनेत मिळू शकतो.
LIC New Jeevan Mangal Plan: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. देशातील कोट्यवधी नागरिकांनी एलआयसीची पॉलिसी खरेदी केली आहे. जर, तुम्ही गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय (Investment Tips) शोधत असाल तर एलआयसीने आणखी एक योजना लाँच केली आहे. छोटी गुंतवणूक आणि चांगला परतावा देणाऱ्या पॉलिसीचे नाव एलआयसी न्यू जीवन मंगल पॉलिसी (LIC New Jeevan Mangal Policy) आहे. यामध्ये तुम्हाला Accidental Benefit सारखा फायदा देखील मिळतो.
पॉलिसी कोण खरेदी करू शकतो?
- पॉलिसी खरेदी करण्यासाठी किमान वय 18 आणि अधिकाधिक वय 55 वर्ष असावे.
- पॉलिसी 65 व्या वर्षी मॅच्युअर होईल
- या पॉलिसीमध्ये किमान 10 हजार रुपये आणि कमाल 50 हजार रुपयांची sum assured रक्कम मिळू शकते.
डेथ बेनिफिटचा लाभ
या पॉलिसीधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास वारसाला डेथ बेनिफिटचा लाभ मिळू शकतो. एखाद्या पॉलिसीधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला प्रीमियमच्या सात पट अथवा 105 टक्क्यांपर्यंतची रक्कम मिळू शकते. जर पॉलिसीधारकाने सिंगल प्रीमियम पॉलिसी खरेदी केली असल्यास त्याचा मृत्यू झाल्यास 125 टक्क्यांपर्यंत प्रीमियम रिटर्न (Policy Return) मिळू शकतो. जर तुम्ही 20 हजार रुपयांची sum assured पॉलिसी घेतली असल्यास तुम्हाला वार्षिक प्रीमियम म्हणून 1,191 रुपये द्यावे लागतील.
या पॉलिसीधारकाला आयकर विभागाच्या नियमांनुसार, 80 सी नुसार कर सवलत मिळते. त्यामुळे कर सवलतीसाठी ही पॉलिसी चांगली ठरू शकते.