एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले, जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर

Petrol-Diesel Price Today 1st February 2022, IOCL Updates : आज आर्थिक वर्ष 2022-23 साठी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.

Petrol-Diesel Price Today 31 January 2022, IOCL Updates : आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री आर्थिक वर्ष 2022-2023 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोनामुळे प्रभावित झालेली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अर्थमंत्र्यांसमोर ठोस पावलं उचलण्याचं आव्हान असणारे. मागणी-पुरवठ्यातील तफावत आणि पुरवठ्यातील व्यत्यय यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती या 90 डॉलर्स प्रति बॅरलच्या आसपास आहेत. त्यामुळे पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारी तेल कंपन्या, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करत नसल्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत. भविष्यात पेट्रोल आणि डिझेल महाग झाल्यास त्याचा थेट परिणाम महागाईवर होणार असल्याची शक्यता निर्माण होत आहे. 

आज 1 फेब्रुवारी रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. सध्या देशातील पेट्रोल-डिझेलचे दर ऐतिहासिक पातळीवर आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असूनही देशातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार आहेत. अशातच देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती अद्यापही सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावत आहेत. दरम्यान, आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अशातच उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवरील कर आणखी कमी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत. IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे. 

महाराष्ट्रात एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर अद्यापही शंभरीपार आहेत. जाणून घेऊयात मुंबई, पुण्यापासून नाशिकसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत...

राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती : 
प्रमुख शहरं पेट्रोलची किंमत प्रति लिटर डिझेलची किंमत प्रति लिटर
मुंबई 109.98 रुपये प्रति लिटर  94.14 रुपये प्रति लिटर
ठाणे 110.12 रुपये प्रति लिटर  94.28  रुपये प्रति लिटर
पुणे 109.72 रुपये प्रति लिटर  92.50 रुपये प्रति लिटर
नाशिक 109.79 रुपये प्रति लिटर 92.57 रुपये प्रति लिटर
नागपूर 110.10 रुपये प्रति लिटर 92.90 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर 109.66 रुपये प्रति लिटर  92.48 रुपये प्रति लिटर
अहमदनगर 110.12  रुपये प्रति लिटर  92.90 रुपये प्रति लिटर
अमरावती 111.14 रुपये प्रति लिटर  93.90 रुपये प्रति लिटर

देशातील महत्त्वाच्या शहरांतील किमती काय? 

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 95.41 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे.

केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. भारतीय तेल कंपन्यांनी 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

देशातील महानगरांतील आजचे दर :
देशातील प्रमुख शहरं  पेट्रोलची किंमत प्रति लिटर डिझेलची किंमत प्रति लिटर 
मुंबई 109.98  94.14
दिल्ली 95.41  86.67
चेन्नई 101.40 91.43
कोलकाता 104.67 89.79
पाटणा 105.92 91.09

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास , या अंतिम निर्णय कुठं अन् कोण घेणार? कृषीमंत्री म्हणाले...
एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास, दोघांवर कारवाई, कृषीमंत्री म्हणाले अंतिम निर्णय...
Sanjay Raut : पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
Beed: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
Who is Neeraj Chopra wife Himani Mor : सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 January 2024Jayant Patil on Akshay Shinde | शाळा मालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, जयंत पाटलांची टीकाVijay Wadettiwar on Devendra Fadnavis|गडचिरोलीला 2 नाहीतर 3 पालकमंत्री द्या,वडेट्टीवारांची खोचक टीकाKho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास , या अंतिम निर्णय कुठं अन् कोण घेणार? कृषीमंत्री म्हणाले...
एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास, दोघांवर कारवाई, कृषीमंत्री म्हणाले अंतिम निर्णय...
Sanjay Raut : पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
Beed: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
Who is Neeraj Chopra wife Himani Mor : सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Embed widget