Petrol Diesel Price: बजेटपूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर बदलणार? जाणून घ्या आजच्या किमती
Petrol Diesel Price: देशातील सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे या किमती निश्चित केल्या जातात.
Petrol and Diesel Price Today: आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय (Budget News 2023) अधिवेशन सुरू होणार आहे. त्यानंतर उद्या म्हणजेच, 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2023) सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प-2 सादर करतील. 2024 हे वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे, त्यामुळे मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. त्यामुळे अर्थसंकल्पात मोदी सरकार काही सवलती देणार का? याकडे सर्वसामान्यांचं लक्ष आहे. तसेच, अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी काही घोषणा होऊ शकते का? याकडेही सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. अशातच, आज भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत.
अर्थसंकल्पापूर्वी 31 जानेवारीला तेल कंपन्यांनी सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही. इंधनाचे दर जुन्याच दरावर कायम आहेत. देशातील चारही महानगरांमधील किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांत किंचित परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता अपडेट केले जातात. देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात आणि त्यानंतर लोकांना पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या किंमतींची माहिती मिळते. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच, पेट्रोल-डिझेल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेपर्यंत त्याचे दर मूळ किमतींपेक्षा अधिक होतात.
Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर?
- नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
- औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
- परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
- नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
देशातील महानगरं | पेट्रोल (प्रति लिटर) | डिझेल (प्रति लिटर) |
दिल्ली | 96.72 रुपये | 89.62 रुपये |
मुंबई | 106.31 रुपये | 94.27 रुपये |
कोलकाता | 106.03 रुपये | 92.76 रुपये |
चेन्नई | 102.63 रुपये | 94.24 रुपये |
Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा
राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.
पेट्रोल-डिझेलच्या किमती एका क्लिकवर जाणून घ्या
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर पाहता येऊ शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) पाहता येतील.