Petrol and Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात एक लिटर डिझेलची किंमत काय?
Petrol and Diesel Price: भारतीय तेल कंपन्यांकडून आजचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. तुम्ही गाडीत पेट्रोल भरण्यापूर्वी आजचे दर चेक करा.
Petrol and Diesel Price Today: भारतीय तेल कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol and Diesel) जाहीर केले आहेत. नव्या दरांनुसार, आज देशातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही. परंतु, देशातील काही शहरांमध्ये इंधन दरांत किंचतशी वाढ, तर काही शहरांमध्ये किंचितशी घट नोंदवण्यात आली आहे. इतर शहरांमध्ये मात्र पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे आहेत.
जरी आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती सर्वोच्च पातळीवर असल्या तरी त्यांच्या प्रभावामुळे भारतात वाहन इंधन, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होताना दिसत नाही. मात्र, डिझेलच्या विक्रीवर तेल कंपन्यांना प्रतिलिटर 13 रुपयांचा तोटा होत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
कच्च्या तेलाचे आजचे दर काय?
कच्च्या तेलाच्या किमतीत आज वाढ होत आहे आणि त्याची किंमत प्रति बॅरल 88 डॉलरवर पोहोचली आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 87.35 डॉलरवर आहे. तर, ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल 80.37 डॉलर आहे.
Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
देशातील महानगरं | पेट्रोल (प्रति लिटर) | डिझेल (प्रति लिटर) |
दिल्ली | 96.72 रुपये | 89.62 रुपये |
मुंबई | 106.31 रुपये | 94.27 रुपये |
कोलकाता | 106.03 रुपये | 92.76 रुपये |
चेन्नई | 102.63 रुपये | 94.24 रुपये |
Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर?
- नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
- औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
- परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
- नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).