Valentine Day : या 'व्हॅलेंटाईन डे'ला तुमच्या पार्टनरला द्या 'हे' खास गिफ्ट, सुरक्षित होईल भविष्य
Valentine Day Financial Gift Ideas for Wife or Husband : तुम्ही यंदा व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने बहिणीसाठी खास फायनान्शिअल गिफ्ट देऊ शकता.
Valentine Day Financial Gift Ideas for Girlfriend : फेब्रुवारी हा प्रेम व्यक्त करण्याचा महिना आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी वेळ आणि निमित्ताची गरज नसते, असं म्हणतात. पण तरी व्हॅलेंटाईन डेची जागा मात्र खास असते. 'व्हॅलेंटाईन डे' जोडपे आपल्या पार्टनरला खास गिफ्ट देऊन सरप्राईज देतात आणि प्रेम व्यक्त करतात. तुम्हाला ही तुमची पत्नी, गर्लफ्रेंड, पती किंवा बॉयफ्रेंडला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही त्यांना आर्थिक गिफ्ट देऊन त्यांचं भविष्य सुरक्षित करु शकता.
आरोग्य विमा (Health Insurance)
आजकाल आरोग्याशी संबंधित समस्या खूप सामान्य आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला आयुर्विमा (Health Insurance) भेट देणं खास आर्थिक भेट ठरेल. यामुळे आरोग्याच्या समस्यांमुळे उद्भवणाऱ्या खर्चाचे व्यवस्थापन करणं सोपं होऊन तुमच्या जोडीदाराचं भविष्य सुखकर होईल.
जीवन विमा (Life Insurance)
जोडीदाराला फायनान्शिअल गिफ्ट देताना लाइफ इन्शुरन्स हा एक चांगला पर्याय आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या पार्टनरला जीवन सुरक्षा देत आहात. तुम्ही तुमच्या पार्टनरला ही खास भेट देऊ शकता.
शेअर्स (Shares)
तुम्ही तुमच्या जोडीदाराला शेअर्सची भेट देऊ शकता. ही भेट थोडी जोखमीची असू शकते. कारण, शेअर्समध्ये गुंतवणूक केल्याने फायदा होण्यासोबतच नुकसान होण्याचीही शक्यता असते. तुम्ही तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन शेअर्स खरेदी करू शकता, त्यानंतर ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हे शेअर्स खरेदी केले आहेत, त्यांच्या डीमॅट खात्यात ते ट्रान्सफर केले जाऊ शकतात. ही भेट तुमच्या जोडीदाराचं भविष्य सुरक्षित करेल.
डिजिटल गोल्ड (Digital Gold)
फार पूर्वीपासून सोने ही एक चांगली भेटवस्तू मानली जाते. तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी सोनं खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुम्ही डिजिटल गोल्ड (Digital Gold) ही गिफ्ट करू शकता. या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी सोने खरेदी करण्याऐवजी, सॉवरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) किंवा गोल्ड ईटीएफ (Gold ETF) ही खरेदी करु शकता. हा सुरक्षिततेची हमी असलेला पर्याय आहे.
(टीप : ही बातमी एबीपी माझा प्रेक्षक आणि वाचकांना माहिती म्हणून देत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. गुंतवणुकीचा कोणताही पर्याय निवडताना संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या, त्यानंतरच योग्य पर्याय निवडा.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Valentine Day : 'व्हॅलेंटाईन डे'ला बॉयफ्रेंडला सरप्राईज द्यायचंय? 'हे' गिफ्ट ठरतील बेस्ट पर्याय