एक्स्प्लोर

SBI FD Scheme: SBI ची मस्त योजना; 400 दिवसांच्या गुंतवणुकीवर भरघोस व्याज, फक्त 7 दिवसच शिल्लक

SBI Amrit Kalash Scheme Deadline : स्टेट बँकेनं यावर्षी 12 एप्रिल 2023 रोजी ही योजना सुरू केली होती आणि तिची अंतिम मुदत आधी निश्चित केलेल्या 23 जूनवरून 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती आणि नंतर ती 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.

SBI Amrit Kalash FD Scheme: आता 2023 वर्ष संपायला फक्त एक आठवडा उरला आहे आणि नवीन वर्ष 2024 (New Year 2024) च्या स्वागताची तयारीही देशभरात जोरात सुरू झाली आहे. या डिसेंबर महिन्याबरोबरच अनेक महत्त्वाच्या कामांची मुदतही संपुष्टात येत आहे. या महत्त्वाच्या कामांमध्ये गुंतवणुकीशी संबंधित योजनांचाही समावेश आहे, त्यापैकी एक SBI अमृत कलश FD योजना (SBI Amrit Kalash FD Scheme) आहे, ज्यामध्ये 400 दिवसांच्या गुंतवणुकीवर प्रचंड व्याज दिलं जात आहे. त्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2023 रोजी संपणार आहे.

मुदत वाढण्याची शक्यता कमीच

यापूर्वी SBI अमृत कलश (SBI Amrit Kalash) योजनेची अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2023 रोजी संपणार होती, पण बँकेनं 31 डिसेंबरपर्यंत वाढवली होती. सध्या या योजनेची अंतिम तारीख वाढवण्याबाबत SBI कडून कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही. याचा अर्थ आता या FD योजनेत गुंतवणूक करण्यासाठी फक्त 7 दिवस उरले आहेत. ही SBI ची विशेष FD योजना आहे, ज्यामध्ये 400 दिवसांची गुंतवणूक करावी लागते.

महत्त्वाची बाब म्हणजे, स्टेट बँकेनं या वर्षी 12 एप्रिल 2023 रोजी ही योजना सुरू केली होती आणि तिची अंतिम मुदत 23 जून 2023 निश्चित करण्यात आली होती. परंतु, शेवटची तारीख संपण्यापूर्वीच बँकेनं ग्राहकांना अमृत कलश योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत संधी दिली. यानंतर, पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आणि 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली, जी आता संपणार आहे.

सिनियर सिटीजंसना 7.6 टक्क्यांचं व्याज 

एसबीआयच्या या विशेष एफडी योजनेत सर्वसामान्य ग्राहकांना 7.1 टक्के दराने व्याज मिळत असताना बँक ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के दरानं व्याज देत आहे. या योजनेवर, मॅच्युरिटी व्याज आणि टीडीएस कापून ग्राहकाच्या खात्यात जमा केले जातात. आयकर कायद्यांतर्गत लागू होणाऱ्या दरानं टीडीएस आकारला जाईल. गुंतवणूकदार अमृत कलश एफडीमध्ये 2 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.

या योजनेत मुदतपूर्व पैसे काढण्याची तरतूद आहे. म्हणजेच, तुम्ही मॅच्युरिटी तारखेपूर्वी पैसे काढू शकता. बँकेच्या म्हणण्यानुसार, अमृत कलश एफडीमध्ये (Amrit Kalash FD) गुंतवणूक करण्यासाठी वेगळ्या उत्पादन कोडची आवश्यकता नाही. यामध्ये तुम्ही योनो बँकिंग अॅप (Yono Banking App) वापरू शकता.

अकाउंट उघडणं अगदी सोपं 

Amrit kalash FD Scheme अमृत ​​कलश एफडी योजनेअंतर्गत, खातेदार मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर त्यांचं व्याज घेऊ शकतात. TDS मधून कापलेलं व्याज ग्राहकाच्या खात्यात जमा केलं जातं. आयकर (IT) नियमांनुसार, कर कपात सूटची विनंती करण्यासाठी तुम्ही फॉर्म 15G/15H वापरू शकता. या योजनेअंतर्गत 19 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे नागरिक त्यांचे खाते उघडू शकतात.

खाते उघडण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड (Aadhaar Card), ओळखीचा पुरावा, वयाचा ओळखीचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, वैध मोबाइल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि ई-मेल आयडी आवश्यक आहे. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला SBI Branch जावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget