Share Market : 5 वर्षात 2500 टक्के परतावा, 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल
Multibagger Stocks : मल्टीबॅगर स्टॉक्सने गुंतवणूकदारांना 2500 टक्के परतावा मिळवून दिला आहे. यामुळे गुंतवणूकदार कोट्यधीश झाले आहेत.
Multibagger Share : शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणूक (Investment) करणं जोखमीचं मानलं जातं, पण असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांचं (Investors) नशीब उजळवण्याचं काम केलं आहे. काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना दीर्घकाळात मल्टीबॅगर रिटर्न्स (Multibagger Return) देऊन श्रीमंत केलं आहे, तर काही शेअर्सनी गुंतवणूकदारांची गुंतवणूक कमी वेळात अनेक पटींनी वाढवली आहे. असाच एक धमाकेदार शेअर म्हणजे, तानला प्लॅटफॉर्म (Tanla Platform). तानला प्लॅटफॉर्म गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) ठरला आहे.
5 वर्षात 2500 टक्के परतावा
जर तुम्हाला मल्टीबॅगर शेअर्समध्ये (Multibagger Shares) पैसे गुंतवायची असेल (Investment Plan) तर आम्ही तुम्हाला एका कम्युनिकेशन कंपनीच्या शेअर्सची (Communication) माहिती देणार आहोत. या शेअरमध्ये गुंतवणूक (Stock Market Investment) केल्यावर 5 वर्षात गुंतवणूकदार कोट्यधीश झाले आहेत. तानला प्लॅटफॉर्म कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. तानला कंपनीच्या (Tanla Platform) शेअर्सनी पाच वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे 2500 पटीनं वाढवले आहेत. यासोबतच शेअर मार्केटमधील मल्टीबॅगर शेअर्सच्या यादीत या शेअरचा समावेश करण्यात आला आहे.
'या' शेअरमुळे गुंतवणूकदारांची चांदी
तानला कंपनीचे शेअर्स (Tanla Platform Shares) गुरुवारी व्यवहाराच्या दिवशी 0.81 टक्क्यांनी घसरले असतील, पण दीर्घकाळात या शेअर्सने गुंतवणूकदारांना (Stock Market Investment) चांगला परतावा (Share Market Return) मिळवून दिला आहे. त्याचे शेअर्स गेल्या एका वर्षात 60.98 टक्क्यांनी म्हणजेच 394.35 अंकांनी वाढून 1,041 रुपयांवर पोहोचले आहेत. ज्यांनी 10 वर्षांपूर्वी कंपनीत 48,000 रुपये गुंतवले होते त्यांना 1 कोटींहून अधिक परतावा मिळाला आहे.
5 वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे 2500 पटीनं वाढले शेअर्स
गेल्या पाच वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 1,003.40 पॉइंट्स म्हणजेच 2,668.62 टक्के वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांसाठी हा मल्टीबॅगर स्टॉक असल्याचे सिद्ध झालं आहे. कंपनीच्या शेअर्सने 10 वर्षांच्या कालावधीत मल्टीबॅगर परतावा दिला आहे. 31 जानेवारी 2014 रोजी कंपनीचे शेअर्स 4.92 रुपये होते, ते आता 1,041 रुपये झाले आहेत. पाच वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे 2500 पटीनं वाढवले आहेत.
तानला प्लेटफॉर्म काय आहे?
तानला प्लॅटफॉर्म जगातील सर्वात मोठ्या CPaaS (Communications Platform as a Service) प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. Tanla एंटरप्राइजेस आणि त्यांच्या ग्राहकांमध्ये एसएमएस, व्हॉइस, ईमेल, RCS, WhatsApp, FB मेसेंजर आणि पुश नोटिफिकेशन्स यांसारख्या अनेक माध्यमांद्वारे संवाद साधण्यास सक्षम करते.
(Disclaimer : ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :