search
×

Stock Market : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताय! जाणून घ्या पुढील आठवड्यात सेन्सेक्स-निफ्टी वाढणार की घसरत राहणार? 

Stock Market : पुढील आठवड्याचे जागतिक संकेत आणि FII चा कल शेअर बाजाराची वाटचाल ठरवतील. याशिवाय मासिक डेरिव्हेटिव्ह सेटलमेंटमुळे देशांतर्गत बाजारात अस्थिरता असू शकते, असे मत शेअर बाजारातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

FOLLOW US: 
Share:

Stock Market : पुढील आठवड्यात जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्याआधी जाणून घ्या पुढील आठवड्यात सेन्सेक्स-निफ्टीचा व्यवहार कसा होणार आहे? भविष्यातही अशी घसरण दिसून येईल की गुंतवणूकदारांना काही दिलासा मिळेल. पुढील आठवड्याचे जागतिक संकेत आणि FII चा कल बाजाराची वाटचाल ठरवतील. याशिवाय मासिक डेरिव्हेटिव्ह सेटलमेंटमुळे देशांतर्गत बाजारात अस्थिरता असू शकते, असे मत शेअर बाजारातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

पाच आठवड्यांच्या घसरणीनंतर निफ्टी वाढला आहे 
स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे संशोधन प्रमुख संतोष मीना यांनी सांगितले की, गेल्या काही सत्रांमध्ये स्थानिक बाजारपेठांमध्ये बरीच अस्थिरता दिसून आली आहे. मात्र, पाच आठवड्यांच्या घसरणीनंतर निफ्टीत तीन टक्क्यांची वाढ झाली आहे.

भारतीय बाजारपेठ चांगल्या स्थितीत आहे
मीना म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेतील चलनवाढ आणि जगभरातील बाजारपेठेतील मंदी ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे विदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करत आहेत. त्यामुळे देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या पाठिंब्यामुळे भारतीय बाजारपेठा चांगल्या स्थितीत आहेत.

डॉलर निर्देशांकापासून दिशा मिळेल
मासिक डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्सच्या सेटलमेंटमुळे या आठवड्यात देशांतर्गत बाजारात काही प्रमाणात अस्थिरता असेल. जागतिक आघाडीवर फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या बैठकीचा तपशील 25 मे रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे, जो बाजाराच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असेल. याशिवाय डॉलर निर्देशांकाचा कल बाजाराला दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी माहिती संतोष मीना यांनी दिली. 

जाणून घ्या तज्ज्ञांचे मत काय आहे?
सॅमको सिक्युरिटीजच्या इक्विटी रिसर्चच्या प्रमुख येशा शाह म्हणाल्या, “गेल्या आठवड्यात बाजार अस्थिर होता. मॅक्रो इकॉनॉमिक डेटा, चालू तिमाही निकालांचा हंगाम आणि डेरिव्हेटिव्ह सेटलमेंटमुळे हा कल या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे.  

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ
गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 1,532.77 अंकांनी म्हणजेच 2.90 टक्क्यांनी वाढला. त्याच वेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 484 अंकांनी म्हणजेच 3.06 टक्क्यांनी वाढला.
 
या आठवड्यात SAIL, Zomato, Adani Ports, Deepak Fertilizers, InterGlobe Aviation, Hindalco, NMDC, GAIL आणि गोदरेज इंडस्ट्रीजचे तिमाही निकाल येतील.लिगेअर ब्रोकिंगचे  अजित मिश्रा म्हणाले की, जागतिक कल, तिमाही निकालांचा अंतिम टप्पा आणि रशिया-युक्रेन युद्धाचा बाजाराच्या दिशेवर परिणाम होईल. 

Published at : 22 May 2022 10:24 PM (IST) Tags: share market sensex bse nifty stock market

आणखी महत्वाच्या बातम्या

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

टॉप न्यूज़

Mirzapur Season 3 OTT Release : 'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...

Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...

Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह

Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू