एक्स्प्लोर

Earn Money : करोडपती होण्याची संधी! शेअर मार्केटमधून पैसे कमवणं सोपं आहे, फक्त 'या' 7 गोष्टी करा

Share Market Guide : शेअर बाजारातून पैसे कमवून मालामाल होणं सोपं आहे, पण हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा ते नियम पाळतात. अखेर त्याच्या यशाचे रहस्य काय आहे, ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

How to Make Money in Share Market : प्रत्येकाला पैसे कमवायला आवडतात. शेअर मार्केट (Share Market) मध्ये भरपूर पैसे कमावता येतात, असं तुम्ही ऐकलं असेल. असे काही लोक आहे, ज्यांनी फक्त 5000 रुपयांच्या गुंतपासून गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि आज शेअर बाजारातून करोडो रुपये कमावत आहेत. 90 टक्क्यांहून अधिक लोक शेअर बाजारातून पैसे कमवण्यात अपयशी ठरतात. प्रत्येक किरकोळ गुंतवणूकदाराने शेअर बाजारात पाऊल ठेवण्यापूर्वी हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. पण यामध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे 10 टक्के किरकोळ गुंतवणूकदार पैसे कमवण्यात यशस्वी ठरतात आणि हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा ते नियम पाळतात. अखेर त्याच्या यशाचे रहस्य काय आहे, ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे कसे कमावू शकता जाणून घ्या. 

1. सुरुवात कशी करावी

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर बाजार म्हणजे काय हे जाणून घ्या. शेअर बाजार कसा चालतो? शेअर बाजारातून लोक कसे कमावतात? कारण शेअर बाजार हे पैसे कमावण्याचे यंत्र नाही. त्यामुळे त्याबाबत सखोल माहिती घ्या. सध्याच्या डिजिटल युगात तुम्ही घरबसल्या ऑनलाइन याविषयी माहिती गोळा करू शकता. याशिवाय तुम्ही यामध्ये आर्थिक सल्लागाराची मदत देखील घेऊ शकता. आर्थिक सल्लागार तुम्हाला सुरुवातीला योग्य दिशा दाखवेल.

2. कमी रकमेपासून गुंतवणूक सुरू करा

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम असणं आवश्यक नाही. बहुतेक लोक ही चूक करतात. काही लोक आपली बचत केलेली संपूर्ण रक्कम शेअर बाजारात गुंतवतात. मग बाजारातील चढ-उतार झाल्याने ते अडचणीत येता.. तुम्ही अगदी छोट्या रकमेतूनही गुंतवणूक करण्यास सुरूवात करू शकता. अगजी 5 रुपयांपासून तुम्हाला गुंतवणूक करता येते.

3. गुंतवणूक करण्यासाठी योग्य कंपन्या निवडा

सुरुवातीला खूप जास्त परताव्यावर लक्ष केंद्रित करणं टाळा. जास्त परतावा मिळवण्यासाठी, लोक मजबूत नसलेल्या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवतात आणि नंतर त्यांचे पैसे अडकतात. म्हणून, सुरुवातील मोठ्या कॅप कंपन्यांमध्ये अनेक गुंतवणूक करणे सुरू करा. ज्या कंपन्या आधीच बाजारात मजबूत असतील, अशा कंपन्यांमध्ये पैसे गुंतवा. जेव्हा तुमच्याकडे काही वर्षांचा अनुभव असेल, तेव्हा तुम्ही किंचित धोकाही पत्करू शकता.

4. गुंतवणूक करत राहण्याची गरज

जेव्हा तुम्ही थोड्या रकमेतून गुंतवणूक करायला सुरुवात करता, तेव्हा दर महिन्याला गुंतवणूक वाढवत रहा. तुमचा पोर्टफोलिओ संतुलित ठेवा. जेव्हा तुम्ही बाजारात काही वर्षे सतत गुंतवणूक करत राहाल, तेव्हा तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता. लक्षात ठेवा बाजारात दीर्घकाळ गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होतो.

5. पेनी स्टॉकपासून दूर राहा

किरकोळ गुंतवणूकदार अनेकदा स्वस्त स्टॉकवर लक्ष केंद्रित करतात. ते त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 10-15 रुपयांच्या समभागांचा समावेश करतात आणि नंतर पडल्यास घाबरतात. स्वस्त शेअर्समध्ये कमी गुंतवणूक करून जास्त कमाई करता येईल असे त्यांना वाटते. पण हा विचार चुकीचा आहे. कंपनीची वाढ लक्षात घेऊन नेहमी शेअर्स निवडा. ज्या कंपनीचा व्यवसाय चांगला आहे आणि तो व्यवसाय चालवणारे व्यवस्थापन चांगले आहे अशा कंपनीतच गुंतवणूक करा.

6. घसरणीला घाबरू नका

जेव्हा शेअर बाजारात घसरण होते, तेव्हा तुमची गुंतवणूक वाढवा. अनेकदा, किरकोळ गुंतवणूकदार जोपर्यंत फायदा मिळतो, तोपर्यंत गुंतवणूक करत राहतात. पण, जेव्हा बाजारात घसरण होते, तेव्हा किरकोळ गुंतवणूकदार घाबरू लागतात आणि गुंतवणूक करणं थांबवतात आणि जास्त नुकसान होण्याच्या भीतीने शेअर्स स्वस्तात विकतात. 

7. कमाईच्या काही भागाची सुरक्षित गुंतवणूक करा.

शेअर बाजारातील कमाईचा काही भाग सुरक्षित गुंतवणूक म्हणून इतर ठिकाणी गुंतवा. प्रत्येक किरकोळ गुंतवणूकदारासाठी सर्वात महत्त्वाची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही माहिती न घेत शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापासून दूर राहावे आणि गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी. देशातील मोठ्या गुंतवणूकदारांचं म्हणणं गांभीर्याने घ्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Embed widget