नोकरी करता करता 'या' मार्गाचा अवलंब करा, पगारापेक्षा जास्त पैसे मिळवा, सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्ही जर एखाद्या ठिकाणी नोकरी (Job) करत असाल तर तुम्हालाही इतर मार्गांनी देखील पैसे कमावता येतात. या मार्गाचा अवलंब करुन तुम्ही पगारापेक्षा (Payment) जास्त पैसे मिळवू शकता.
Personal Finance News : प्रत्येकालाच भरपूर पैसे कमवायचे आहे. पैसे कमवायचे असतील तर अगोदर पैशांचं नियोजन करणं महत्वाचं आहे. पैशांची बचत (Saving money) करणे, सुरक्षीत ठिकाणी गुंतवणूक (invetsment) करणं हे महत्वाचे आहे. दरम्यान, तुम्ही जर एखाद्या ठिकाणी नोकरी (Job) करत असाल तर तुम्हालाही इतर मार्गांनी देखील पैसे कमावता येतात. या मार्गाचा अवलंब करुन तुम्ही पगारापेक्षा (Payment) जास्त पैसे मिळवू शकता. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
स्टार्टअपमध्ये गुंतवणूक फायद्याची
तुम्ही नोकरी करत असताना एखाद्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करु शकता. ही गुंतवणूक तुमच्या फायद्याची ठरते. सध्या अनेक नवीन स्टार्टअप सुरु झाली आहेत. नवीन स्टार्टअप सुरु केलेल्या लोकांचा शोध घ्या आणि त्यामध्ये गुंतवणूक करा. ही गुंतवणूक करताना तुमच्या नोकरीवर कोणताही परिणाम होणार नाही. तुम्ही या गुंतवणूकीच्या माध्यमातून नोकरीपेक्षा जास्त पैसे मिळवू शकाल.
कर्ज देऊन त्यावर व्याज मिळवू शकता
ज्या लोकांना पैशांची गरज आहे, अशांना कर्जाच्या स्वरुपात रक्कम देऊन व्याजाच्या माध्यमातून पैसे मिळवणे हा देखील मिळकतीचा चांगला मार्ग आहे. अनेकजण पैशांची गरज असल्यास कर्जासाठी बँकेकड जातात. असे लोक जर वेळेत पैसे परत करणार असतील तर त्यांना कर्जाच्या स्वरुपात मदत करणे सोयीचे आहे. कारण व्याजाच्या माध्यमातून तुम्ही मिळकत करु शकता. तुम्ही जर एखाद्या बँकेत FD मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला यावेळी जास्तीत जास्त 7 ते 8 टक्के व्याज मिळेल, पण कर्ज दिल्यावर तुम्हाला किमान 13 ते 15 टक्के व्याज मिळेल.
स्टॉक मार्केटमधील गुंतवणूक पैसे मिळवण्याचा चांगला मार्ग
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे हे देखील फायद्याचे ठरते. पैसे मिळवण्याचा हा देखील चांगला मार्ग आहे. तुम्ही अभ्यास करुन चांगले परतावा देणारे शेअर्स निवडू शकता. त्यातून चांगला नफा मिळवू शकता. तुम्हाला जर कमी जोखीम हवी असेत तर तुम्ही म्युच्युअल फंडाचा मार्ग अवलंबू शकता. यावर तुम्हाला सरासरी 12 ते 13 टक्के परतावा मिळू शकतो. तुम्ही जर चांगले शेअर्स निवडले तर तुम्हाला आणखी मोठा फायदा होऊ शकतो.
वरील तिन्ही मार्गाचा अवलंब करुन तुम्ही नोकरी करत करत इतर मार्गांनी पैसे कमवू शकता. एका बाजूला नोकरी देखील सुरु राहील आणि दुसऱ्या बाजूला अन्य मार्गाने तुमच्याकडे पैसे देखील येतील.
महत्वाच्या बातम्या:
'या' कंपनीत पैसे गुंतवा अन् व्हा मालामाल, एका महिन्यात दिलेत तब्बल 582 टक्क्यांनी रिटर्न्स