(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'या' कंपनीत पैसे गुंतवा अन् व्हा मालामाल, एका महिन्यात दिलेत तब्बल 582 टक्क्यांनी रिटर्न्स
TAC Infosec ही कंपनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. या कंपनीत विजय केडिया यांनीदेखील गुंतवणूक केलेली आहे.
मुंबई : वेगवेगळ्या कंपन्यांच्या आयपीओंवर (IPO) गुंतवणूकदारांना लक्ष ठेवले पाहिजे. संबंधित आयपीओतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता असल्यास त्यात जरूर गुंतवणूक केली पाहिजे. याआधी असे काही आयपीओ येऊन गेले आहेत, जे शेअर बाजारावर सूचिबद्ध होताच, सुस्साट वेगाने पुढे गेले आहेत. सूचिबद्ध होतानाच या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना भन्नाट रिटर्न्स दिले आहेत. TAC Infosec ही कंपनीदेखील याच प्रकारात मोडते. या कंपनीने आपल्या आयपीओच्या माध्यमातून तसेच शेअर बाजारावर (Share Market) सूचिबद्ध झाल्यावरही गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. विशेष म्हणजे शेअर बाजारातील (Share Market Update) दिग्गज गुंतवणूकदार दिग्गज केडिया (Vijay Kedia) यांनीदेखील या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेले आहेत. या कंपनीने एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 500 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स दिले आहेत.
विजय केडिया यांची TAC Infosec मध्ये गुंतवणूक
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनीदेखील या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेले आहेत. TAC Infosec ची 74 टक्के मालकी ही कंपनीच्या संस्थापकाकडे आहे. तर या कंपनीचे 15 टक्के शेअर्स विजय किशनलाल केडिया यांनी खरेदी केलेले आहेत. अंकित विजय केडिया यांचीदेखील या कंपनीत 5 टक्के मालकी आहे. टीएसी इन्फोसेक या कंपनीच्या आयपीओचे मूल्य 106 रुपये होते. शअर बाजारावर सूचिबद्ध झाल्यानंतर आता या कंपनीच्ये शेअरचे मूल्य हे 724 रुपए रुपयांपर्यंत पोहोचले आहे. एका महिन्यात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 582 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
बाजार घरंगरळा तरी टीएसी इन्फोटेकला अपर सर्किट
गेल्या काही दिवसांपासून टीएसी इन्फोटेक या कंपनीचा शेअर हा सलग अपर सर्किटवर आहे. मंगळवारी अनेक कंपन्यांचे शेअर्स पडले. मात्र अशा स्थितीतही या कंपनीच्या शेअर्सचे मूल्य पाच टक्क्यांनी वाढले होते. TAC Infosec Limited या कंपनीची सुरुवात 2016 मध्ये झाली होत. 5 एप्रिल 2024 रोजी ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाली होती. NSE SME वर ही कंपनी 290 रुपयांवर लिस्ट झाली होती.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :