Waaree Renewable : एक लाख रुपयांचे झाले 5 कोटी रुपये, गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवणारा शेअर
Multibagger Share : वारी रिन्यूएबल (Waaree Renewable) शेअरने गुंतवणूकदारांना (Share Market Investment) भरघोस नफा मिळवून दिला आहे.
Share Market Investment : शेअर बाजारात (Stock Market) गुंतवणूक (Investment) करणे जोखीमीचं मानलं जातं. पण, योग्य ठिकाणी पैसे गुंतवल्यास तुम्हाला भरघोस नफा मिळवता येतो. जर तुम्हाला कुणी सांगितलं की, एक लाख रुपये गुंतवणूक केल्यानंतर पाच वर्षात तुम्हाला पाच कोटी रुपये परतावा मिळेल, तर तुम्ही यावर विश्वास ठेवाल का? पण हे खरं झालं आहे. एका शेअरने गुंतवणूकदारांना कोट्यधीश केलं आहे. एक लाख रुपये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी पाच वर्षात 5 कोटी रुपये परतावा मिळवला आहे. यामुळे हा शेअर मल्टीबॅगर ठरला आहे.
एक लाख रुपयांचे पाच कोटी रुपये
या मल्टीबॅगर स्टॉकचं नाव आहे वारी रिन्यूएबल टेक्नोलॉजी लिमिटेड (Waaree Renewable Technologies Ltd). वारी रिन्यूएबल टेक्नोलॉजी लिमिटेड शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. वारी रिन्यूएबल शेअरने फक्त पाच वर्षात गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपयांचे पाच कोटी रुपये केले आहेत.
एका शेअरची किंमत फक्त 17 रुपये
पाच वर्षांपूर्वी वारी रिन्यूएबल एका शेअरची किंमत 20 रुपयांपेक्षा कमी होती. 1 फेब्रुवारी 2019 रोजी वारी रिन्यूएबल टेक्नोलॉजी लिमिटेडच्या एका शेअरची किंमत फक्त 17 रुपये होती. नुकतेच गुरुवारी, 25 जानेवारीला या कंपनीचे शेअर्स 3,317.15 रुपयांवर बंद झाले. हा पाच वर्षांतील या शेअरने 19,412.65 टक्के इतका मोठा परतावा मिळवून दिला आहे. म्हणजे गेल्या पाच वर्षांत या शेअरचे मूल्य सुमारे 474 पटीने वाढलं आहे.
5 वर्षात किंमत 474 पट वाढली किंमत
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 फेब्रुवारी 2019 रोजी Waaree Renewable Technologies च्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आज त्याच्या 1 लाख रुपयांचे मूल्य 474 पटीनं वाढलं असतं. 474 पट 1 लाख रुपये 4.74 कोटी होतात. हे 5 कोटी रुपयांपेक्षा थोडे कमी आहे.
एका वर्षात 6 पट पेक्षा जास्त वाढ
सध्या या शेअरची घोडदौड अद्यापही कमी झालेली नाही. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी या शेअरच्या किमतीत 5 टक्क्यांची वरची सर्किट होती. गेल्या 5 दिवसांत या शेअरची किंमत 27 टक्क्यांनी वाढली आहे, तर अवघ्या एका महिन्यात ही किंमत 83 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या 6 महिन्यांत या शेअरमध्ये 129 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे, तर एका वर्षात 570 टक्क्यांनी जबरदस्त उडी मारली आहे.
(Disclaimer : ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :