एक्स्प्लोर

NPS Monthly Income : NPS मधील गुंतवणूक देईल निवृत्तीनंतर दरमहा 2 लाख रुपये; जाणून घ्या कसे?

Income After Retirement : निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा 2 लाख रुपये पेन्शन मिळू शकते. त्यासाठी या फॉर्म्युल्याचा अवलंब करावा लागेल.

मुंबई वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर सगळ्यांना निवृत्तीनंतरची चिंता सतावत असते. निवृत्तीनंतर खर्च कसा भागवायचा, दरमहा उत्पन्न कसे मिळवायचे याची चिंता सतावू लागते. निवृत्तीनंतर प्रत्येकाला पैशांची गरज भासते. भले ती व्यक्ती इतरांवर अवलंबून असो अथवा नको. राष्ट्रीय पेन्शन योजनेद्वारे (NPS) निवृत्तीनंतर उत्पन्न (Pension) मिळवले जाऊ शकते.  

जर तुमचे वय 40 वर्षे असेल आणि तुम्ही तुमच्या सेवानिवृत्तीसाठी अद्याप बचत केली नसेल, तर काळजी करण्याची अजिबात गरज नाही. थोडेसे नियोजन आणि नियमित गुंतवणुकीसह, तरीही तुम्ही NPS मधून दरमहा 2 लाख रुपये कमवू शकता. तुम्ही किती निधी जमा करू शकता हे NPS मधून किती परतावा मिळेल हे निश्चित होईल. 

40 टक्के एन्युटी खरेदी करणे आवश्यक 

सध्या एनपीएस ग्राहक मॅच्युरिटीवर संपूर्ण रक्कम काढू शकत नाही. मुदतपूर्तीच्या वेळी, एकूण निधीपैकी 40 टक्के रक्कम एन्युटी खरेदीसाठी वापरावी लागेल. ही एन्युटी रक्कम निवृत्तीनंतर नियमित पेन्शन देईल. उर्वरित 60 टक्के रक्कम ही एकरकमी रक्कम काढता येते. मात्र, तुमच्याकडे एन्युटी खरेदी करण्यासाठी या एकरकमी रकमेचा काही भाग वापरण्याचा पर्याय देखील आहे. अशा प्रकारे, एनपीएस ग्राहक 100 टक्के रक्कम एन्युटी खरेदी करण्यासाठी वापरू शकतात.

एन्युटी म्हणजे वार्षिकी होय. हा ग्राहक आणि विमा कंपनी यांच्यातील करार आहे ज्यासाठी विमाकर्त्याने तुम्हाला त्वरित किंवा भविष्यात पेमेंट करणे आवश्यक आहे. एकरकमी पेमेंट किंवा हप्त्यांच्या मालिकेच्या बदल्यात तुम्हाला तुमच्या उर्वरित आयुष्यासाठी निश्चित रक्कम मिळते.

दरमहा 2 लाख रुपयांचे पेन्शन कसे मिळवावे? 

समजा, सध्या तुमचे वय सध्या 40 वर्ष आहे. एनपीएसमध्ये एकरकमी रक्कम जमा करण्यासाठी 20 वर्षांचा कालावधी आहे. जर, तुम्हाला एनपीएसच्या माध्यमातून दरमहा दोन लाख रुपये पेन्शन हवी असल्यास तुम्हाला किती रक्कम भरावी लागेल, हे समजून घ्या. 

दरमहा दोन लाख रुपयांची पेन्शन मिळवण्यासाठी

मॅच्युरिटीच्या वेळी म्हणजेच वयाच्या 60 व्या वर्षी एकूण NPS फंड 4.02 कोटी रुपये असणे आवश्यक आहे. त्यापैकी 40 टक्के रक्कम एन्युटी खरेदीसाठी वापरावी लागेल. अशा परिस्थितीत, तुम्हाला एन्युटी खरेदी करण्यासाठी 1.61 कोटी रुपये खर्च करावे लागतील किंवा गुंतवणूक करावी लागेल. वयाच्या 60 व्या वर्षी तुमच्याकडे एकरकमी 2.41 कोटी रुपये असतील आणि मासिक पेन्शनसाठी पुरेसा परतावा  नसेल तर तुम्ही करमुक्त एकरकमी रक्कम डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये किंवा डेट आणि इक्विटीमध्ये गुंतवू शकता.

समजा, तुम्हाला तुमच्या एकरकमी रक्कम आणि एन्युटी मध्ये प्रत्येकी 6 टक्के वार्षिक परतावा मिळेल. त्यामुळे तुम्ही तुमचे मासिक उत्पन्न सहज मिळवू शकता. एकूण फंडपैकी 40 टक्के रक्कम एन्युटी मध्ये गुंतवल्यास, तुम्हाला दरमहा 80,398 रुपये पेन्शन मिळेल. डेट इन्स्ट्रुमेंटमधून 6 टक्के परताव्यावर, तुम्हाला एकरकमी रकमेतून दरमहा रु. 1,20,597 मिळतील. याचा अर्थ असा की तुमच्या गुंतवणुकीतून तुम्हाला प्रत्येक महिन्याला एकूण 2,00,995 रुपये पेन्शन मिळेल.

20 वर्षात किती गुंतवणूक करावी लागेल?

NPS च्या वेबसाईटवर (npstrust.org.in/nps-calculator) उपलब्ध असलेल्या कॅल्क्युलेटरनुसार, तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी गुंतवणूक सुरू करताच, तुम्हाला पुढील 20 वर्षे NPS मध्ये दरमहा 52,500 रुपये गुंतवावे लागतील. सरासरी तुमच्याकडे 50 टक्के आणि त्याहून अधिक इक्विटी एक्सपोजर असू शकते, जे तुम्हाला 20 वर्षांच्या दीर्घ कालावधीत आकर्षक परतावा देऊ शकते. वार्षिक 10 टक्के परतावा गृहीत धरल्यास, मॅच्युरिटीच्या वेळी एकूण NPS गुंतवणूक कॉर्पस 4.02 कोटी रुपये होईल.

बाजाराच्या जोखमीवर परतावा अवलंबून

NPS मधील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा बाजाराच्या जोखमीवर अवलंबून आहे. तुम्ही तुमच्या इन्वेस्टमेंट फेज अथवा एकाच वेळी गुंतवणूक करत असाल तर बाजाराच्या स्थितीनुसार, तुम्हाला परतावा मिळेल. तुम्हाला दोन्हीपैकी कोणत्याही परिस्थितीत चांगला परतावा मिळत असेल, तर तुम्ही गुंतवणुकीची रक्कम कमी ठेवू शकता.

जर तुम्हाला खात्री असेल की तुम्हाला गुंतवणुकीच्या टप्प्यात 9 टक्के दराने परतावा मिळेल, तर तुम्हाला 2 लाख रुपयांच्या मासिक उत्पन्नासाठी फक्त 3.14 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असेल. यापैकी एकरकमी 1.88 कोटी रुपये आणि एन्युटी रक्कम 1.26 कोटी रुपये असेल.

समजा तुम्ही एनपीएसमध्ये दरमहा 41,000 रुपये गुंतवता. वार्षिक 10 टक्के परताव्यावर, मुदतपूर्तीच्या वेळी निधीचे मूल्य 3.14 कोटी रुपये असेल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला 11 टक्के परतावा मिळण्याची अपेक्षा असेल, तर तुम्हाला 3.14 कोटी रुपयांच्या फंडासाठी दरमहा केवळ 36,000 रुपये गुंतवावे लागतील.

गुंतवणुकीसाठी ऑटो चॉइस की अॅक्टिव चॉइस?

NPS मध्ये गुंतवणूक करताना, तुम्हाला दोन पर्याय दिले जातात. यामध्ये अॅक्टिव्ह चॉईस आणि दुसरा पर्याय हा ऑटो चॉईसचा आहे. अॅक्टिव्ह चॉइस पर्यायामध्ये, NPS ग्राहक त्यांचे NPS कॉर्पस इक्विटी, कॉर्पोरेट कर्ज, सरकारी कर्ज आणि पर्यायी गुंतवणूक निधीमध्ये  प्रमाण ठरवू शकतात. अ‍ॅक्टिव्ह चॉइस पर्यायांतर्गत, तुम्ही एकूण रकमेच्या 75 टक्के रक्कम इक्विटीमध्ये गुंतवू शकता.

मात्र, वयाची 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, इक्विटी वाटपाची मर्यादा दरवर्षी 2.5 टक्क्यांनी कमी होऊ लागते. इक्विटीमध्ये गुंतवण्याची कमाल रक्कम 50 वर्षे वयाच्या 72.5 टक्के, वयाच्या 52 व्या वर्षी 70 टक्के, वयाच्या 53 व्या वर्षी 67.5 टक्के आणि वयाच्या 60 व्या वर्षी 50 टक्के होईल. तुम्ही सरकारी रोखे किंवा कॉर्पोरेट बाँडमध्ये जास्तीत जास्त 100 टक्के गुंतवणूक करू शकता.

ऑटो चॉईस पर्यायांतर्गत, तीन लाइफ सायकल फंड गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहेत - अग्रेसिव्ह लाइफ सायकल फंड, मॉडरेट लाइफ सायकल फंड आणि कंझर्व्हेटिव्ह लाइफ सायकल फंड. प्रत्येक फंडांतर्गत तुमचे गुंतवणुकीचे वाटप पूर्वनिर्धारित सूत्राच्या आधारे केले जाते. प्रत्येक उत्तीर्ण वर्षासह, इक्विटी आणि कॉर्पोरेट डेटचा धोका हळूहळू कमी होतो. तुमच्या जोखमीच्या क्षमतेनुसार तुम्ही फंड निवडू शकता. तुम्हाला पोर्टफोलिओचे संतुलन करण्यासाठी वारंवार सहभागी होण्याची आवश्यकता नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Embed widget