HDFC Bank : EMI आणखी वाढणार; HDFC Bank चे कर्ज महागले
HDFC Bank Loan: एचडीएफसी बँकेचे कर्ज आता आणखी महागणार आहे. बँकेने एमसीएलआर दरात वाढ केली आहे.
![HDFC Bank : EMI आणखी वाढणार; HDFC Bank चे कर्ज महागले HDFC Bank Hikes Its MCLR By 10 Basis Points From 7th September 2022 HDFC Bank : EMI आणखी वाढणार; HDFC Bank चे कर्ज महागले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/07/92cdcf7b5aa9b814819cf7301f8f807a1662541258022290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
HDFC Bank Loan: देशातील सर्वात मोठी खासगी बँक HDFC बँकेकडून कर्ज घेतलेल्या ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे. एचडीएफसी बँकेने पुन्हा एकदा कर्ज (HDFC Bank Loan) महाग केले आहेत. बँकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 10 बेसिस पॉईंटची वाढ (HDFC Bank Hike MCLR) करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून हा नवीन दर लागू होणार आहे.
एचडीएफसी बँकेने 7 सप्टेंबर 2022 पासून एक वर्षासाठी MCLR दर 8.10 टक्क्यांहून वाढवून 8.20 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. सहा महिन्यांसाठी MCLR दर हा 7.95 टक्क्यांहून वाढवून 8.05 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांसाठी हा दर 7.85 हून 7.95 टक्के करण्यात आला आहे. एक महिन्यासाठीचा MCLR दर 7.90 टक्क्यांहून 8 टक्के करण्यात आला आहे. ओव्हनाइट MCLR दर 7.80 टक्क्यांहून 7.90 टक्के करण्यात आला आहे.
मे ते ऑगस्ट महिन्याच्या कालावधीत आरबीआयने तीन टप्प्यांमध्ये रेपो दरात 1.40 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यानंतर सध्या रेपो दर हा 5.40 टक्के इतका झाला आहे. रेपो दरात वाढ झाल्याने बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणे महाग झाले आहे. त्यामुळे या वाढीव दराचा भार ग्राहकांवर पडत आहे. एचडीएफसी बँकेने 7 जुलै 2022 रोजी 20 बेसिस पॉईंटची वाढ केली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात रेपो दरात वाढ झाल्यानंतर MCLR च्या दरात वाढ करत बँकेने कर्ज महाग केले होते. एचडीएफसी बँकेने MCLR दरात वाढ केल्याने गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्जासह इतर प्रकारचे कर्ज महाग होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना अधिक ईएमआय भरावा लागणार आहे.
>> MCLR म्हणजे काय?
Marginal Costs of Fund-Based Lending Rate म्हणजे MCLR हा रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीनंतर लागू केला. MCLR मुळे ग्राहकांना कर्ज घेणे सोपं झालं. MCLR म्हणजे घेतलेल्या कर्जावरील किमान व्याज दर असतो. याआधी कर्जाच्या व्याजासाठी बेस रेट असायचा. मात्र, आरबीआयने 1 एप्रिल 2016 पासून MCLR लागू केला. बँक आणि ग्राहक या दोघांचाही फायदा व्हावा, बँकेच्या व्याज दर ठरवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी MCLR लागू करण्यात आला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)