MSSC Saving Scheme : खास महिलांसाठी दमदार योजना! 7.50 टक्के व्याज, फक्त 1000 रुपयांपासून सुरुवात
Mahila Samman Saving Certificate : महिला सन्मान बचत योजना महिलांसाठी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
Best Saving Scheme for Women : आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक जण गुंतवणूक करण्याचा विचार करतो. केंद्र सरकारकडून महिलांसाठी खास योजना (Governmant Saving Scheme for Women) आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सुरक्षिततेची हमी मिळते. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना (Mahila Samman Saving Certificate Scheme) केंद्र सरकारची योजना (Central Governmant) असून ही महिलांसाठी खास योजना आहे. या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण (Nirmala Sitharaman) यांनी 2023 च्या अर्थसंकल्पीय (Budget 2023) भाषणात केली होती. या योजनेमध्ये पहिला अल्पकालवधीसाठी गुंतवणूक करुन बचत करु शकतात. या योजनेमध्ये (MSSC Saving Scheme) कोणतीही महिला गुंतवणूक करु शकते. तुम्हीही या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर या योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
महिला सन्मान बचत योजना
महिला सन्मान बचत योजनेअंतर्गत (MSSC Saving Scheme) कोणतीही महिला 1000 रुपये ते 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवू शकते. तुम्ही या योजनेअंतर्गत नोव्हेंबर 2023 मध्ये खाते उघडल्यास, या योजनेची मॅच्युरिटी 2025 मध्ये असेल. या योजनेअंतर्गत तुम्हाला 7.50 टक्के व्याजदराचा लाभ मिळेल.
किती रक्कम गुंतवता येईल?
महिला सन्मान बचत योजनेत तुम्ही 1000 ते 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवू शकता. तुम्ही या योजनेअंतर्गत नोव्हेंबर 2023 मध्ये खाते उघडल्यास, या योजनेची मॅच्युरिटी 2025 मध्ये असेल. या योजनेअंतर्गत तुम्हाला 7.50 टक्के व्याजदराचा लाभ मिळेल. जर एखाद्या मुलीचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर ती तिच्या पालकांच्या देखरेखीखाली पोस्ट ऑफिस खातं उघडू शकतं. या खात्यात गुंतवणूक केल्यास, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांची सूट मिळेल.
महिला सन्मान बचत सर्टिफिकेट योजनेत खातं कसं उघडायचं?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत, तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदासारख्या अधिकृत बँकांमध्ये खाते उघडू शकता. हे खाते उघडण्यासाठी तुम्हाला फॉर्म 1 भरावा लागेल. खाते उघडताना तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, केवायसी कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असेल.
तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याची सुविधा
नियमांनुसार, खातेधारकाची इच्छा असल्यास, एक वर्षानंतर महिला बचत योजनेच्या खात्यातून 40 टक्के रक्कम काढता येऊ शकते. खातेदार आजारी पडल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही खाते उघडल्यानंतर 6 महिन्यांनंतर ते बंद करू शकता. असे केल्यास तुम्हाला 5.5 टक्के दराने व्याजदराचा लाभ मिळेल.