search
×

Ranveer Singh Sold Flats : अभिनेता रणबीर सिंहवर घर विकण्याची वेळ, मुंबईतील दोन घरांची कोट्यवधींमध्ये डील

Real Estate : अभिनेता रणबीर सिंहने मुंबईच्या गोरेगाव परिसरातील दोन अपार्टमेंट विकले आहेत. यासाठी कोट्यवधींची डील झाली आहे.

FOLLOW US: 
Share:

Ranveer Singh Sold Flats : बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) रणवीर सिंह (Ranveer Singh) ने मुंबईच्या गोरेगाव (Mumbai’s Goregaon Suburb) परिसरातील दोन अपार्टमेंट (Residential Properties) विकले आहेत. अभिनेता रणवीर सिंहने मुंबईच्या गोरेगाव उपनगरातील दोन फ्लॅट्स विकले आहेत. गोरेगाव (Goregaon) स्थित दोन अपार्टमेंट (Adjacent Apartments) आणि एकूण सहा कार पार्किंग स्लॉट्स विकले आहेत. 

रणवीर सिंहने मुंबईतील दोन फ्लॅट विकले

रणवीर सिंहच्या मुंबईतील दोन घरांची कोट्यवधींमध्ये डील कोट्यवधीमध्ये डील झाली आहे. हा करार 6 नोव्हेंबर रोजी नोंदवण्यात आला होता, असे कागदपत्रांवरून समोर आलं आहे. कागदपत्रांनुसार, हा फ्लॅट त्याच गृहसंकुलातील एका व्यक्तीला विकण्यात आला आहे. या दोन फ्लॅट व्यतिरिक्त रणवीर सिंहकडे बांद्रा येथे 119 कोटी रुपयांचा फ्लॅट आहे, जो त्याने 2022 मध्ये खरेदी केला होता.

स्टॅम्प ड्युटीवरसाठी इतके लाख रुपये खर्च

रणवीर सिंहने दोन निवासी मालमत्ता एकूण 15.2 कोटी रुपयांना विकल्या आहेत. त्याने प्रीमियम निवासी प्रकल्प ओबेरॉय एक्क्झिट (Oberoi Exquisite) च्या एका टॉवरच्या 43व्या मजल्यावरील दोन्ही लगतचे अपार्टमेंट्स विकले आहेत. हे अपार्टमेंट्स 2,648 चौरस फूट पसरलेले आहेत. या यासह एकूण सहा कार पार्किंग स्लॉट्स (Car Parking Slots) रणवीरने 7.62 कोटी रुपयांना विकले आहेत. या व्यवहारांवर एकूण 91.50 लाख रुपये मुद्रांक शुल्क आकारले गेलं आहे. दरम्यान, हे घर विकण्यामागचं कारण समोर आलेलं नाही.

View this post on Instagram
 
A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

रणवीर सिंहचा वांद्रेमध्ये 119 कोटींचा आलिशान फ्लॅट

रणवीर सिंहचा मुंबईतील वांद्रे भागात 119 कोटींचा आलिशान फ्लॅट आहे. रणवीरने 2022 मध्ये आलिशान क्वाड्रप्लेक्स फ्लॅट घेतला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या फ्लॅटची किंमत सुमारे 119 कोटी रुपये होती. हे फ्लॅट रणवीर सिंगचे वडील जगजीत सुंदर सिंह भवनानी आणि रणवीरची कंपनी ओह फाइव्ह ओह मीडिया वर्क्स एलएलपी (Oh Five Oh Media Works LLP) यांनी खरेदी केले आहेत. रणवीर सिंग आणि त्याचे वडील दोघेही कंपनीत संचालकपदावर आहेत. या मालमत्तेचा सौदा 118.94 कोटी रुपयांना झाला आणि त्यासाठी 7.13 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले.

Published at : 11 Nov 2023 03:32 PM (IST) Tags: Actor Personal Finance property business mumbai Entertainment BOLLYWOOD ranveer singh apartments

आणखी महत्वाच्या बातम्या

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

टॉप न्यूज़

मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट

मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ