2000 रुपयाच्या नोटा बदलण्यात अजूनही अडचणी येत आहेत? आरबीआय 'हा' नवा जुगाड, घरबसल्या नोटा जमा करा
Rs 2000 Note Deposit Last Date : 2000 च्या नोटा जमा आणि बदलण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2023 आहे. त्याधी तुम्ही नोटा जमा करु शकता.
Rs 2000 Note Deposit : तुमच्याकडे अजूनही 2000 रुपयांची नोट आहे, जी तुम्ही बँक (Bank) किंवा भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कार्यालयात जाऊन बदलू शकत नाही किंवा त्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ नाही? RBI चे प्रादेशिक कार्यालय तुमच्यापासून लांब असेल तर काळजी करू नका, भारतीय रिझर्व्ह बँकेने तुमच्यासाठी एक नवीन पर्याय शोधला आहे. आरबीआयने आता तुमच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी नोंदणीकृत पोस्टाची सुविधा सुरु केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियुक्त प्रादेशिक कार्यालयांना तुम्ही 2,000 रुपयांच्या नोटा पोस्टाने पाठवू शकतात. रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयांपासून दूर राहणाऱ्यांसाठी हा एक सोपा पर्याय आहे.
नोटा जमा करण्यासाठी रांगेत उभे राहण्यापासून सुटका
बँकेमध्ये 2000 रुपयाच्या नोटा जमा आणि बदलण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2023 आहे. 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी रांगेत उभे राहण्यापासून तुमची सुटका होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे प्रादेशिक संचालक रोहित पी. यांनी सांगितलं आहे की, आम्ही ग्राहकांना 2000 रुपयांच्या नोटा नोंदणीकृत पोस्टद्वारे पाठवण्याचा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध करत आहोत. यामुळे शाखेत जाण्याच्या आणि रांगेत उभे राहण्याच्या त्रासापासून ग्राहकांची बचत होणार आहे. TLR आणि विमा उतरवलेले पोस्ट हे दोन्ही पर्याय अत्यंत सुरक्षित आहेत आणि त्यामुळे या पर्यायांबद्दल लोकांनी मनात कोणतीही भीती ठेवू नये.
2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची मुदत
आकडेवारीनुसार, दिल्ली कार्यालयाला आतापर्यंत सुमारे 700 TLR फॉर्म मिळाले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) त्याच्या कार्यालयातील 2000 नोट एक्सचेंज सुविधेव्यतिरिक्त या दोन पर्यायांचा समावेश करत आहे. 19 मे रोजी आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. लोकांना या नोटा बँकांमध्ये जमा करण्याची आणि इतर मूल्यांच्या नोटांसह बदलण्याची सुविधा देण्यात आली.
19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या एकूण नोटांपैकी 97 टक्क्यांहून अधिक नोट आता परत आल्या आहेत. या नोटा बदलून देण्याची किंवा बँक खात्यात जमा करण्याची अंतिम मुदत पूर्वी 30 सप्टेंबर होती. त्यानंतर ही मुदत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली. 7 ऑक्टोबरनंतर तुम्हाला 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार नाहीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :