Paytm Crisis : पेटीएमची सेवा सुरूच राहणार, क्यूआर कोड, साऊंड बॉक्स आणि कार्ड मशिनचा वापर कायम करता येणार, RBI चे स्पष्टीकरण
Paytm Payments Bank : आरबीआयच्या कारवाईनंतर One 97 Communications ने ॲक्सिस बँकेला नोडल खाते दिले आहे, जेणेकरून व्यापाऱ्यांना पेमेंट करताना कोणतीही अडचण येऊ नये.
Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट्स बँकेवर (Paytm Payments Bank) कारवाई केल्यानंतर पेटीएमवरून पैसे ट्रान्सफर करता येणार का किंवा त्याची सेवा सुरू राहणार का असे एक ना अनेक प्रश्न ग्राहकांना पडले आहेत. त्यावर आता आरबीआयने त्यांच्या प्रश्नोत्तरांमधून स्पष्टीकरण दिलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे की कंपनीचा क्यूआर कोड, साउंड बॉक्स आणि कार्ड मशीन कोणत्याही समस्येशिवाय काम करत राहतील.
पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमच्या या सेवांबाबत बाजारात अफवा पसरल्या होत्या. पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सने व्यापाऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांचे नोडल खाते ॲक्सिस बँकेला दिले आहे. यासाठी एस्क्रो खाते उघडले जाईल. One 97 कम्युनिकेशन्सची उपकंपनी पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस (पीपीएसएल) आधीच ॲक्सिस बँकेसोबत काम करत होती.
पेटीएम सेवा सुरूच राहणार
RBI बंकेने पेटीएमला दिलासा देत ठेवी घेण्यावरील बंदीची अंतिम तारीख 29 फेब्रुवारीवरून वाढवून 15 मार्च केली आहे. याशिवाय ग्राहकांना येणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी FAQ म्हणजे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्याची उत्तरं देखील जारी करण्यात आले आहेत. यावरून हे स्पष्ट झाले आहे की पेटीएमची व्यापारी पेमेंट सेवा 15 मार्चनंतरही सुरू राहणार आहे.
पेटीएमचेही स्पष्टीकरण
फिनटेक कंपनीने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की व्यापाऱ्यांचे QR कोड, साउंड बॉक्स आणि कार्ड मशीन कोणत्याही व्यत्ययाशिवाय कार्यरत राहतील. व्यापारी सेटलमेंटमध्ये कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री करण्यासाठी ॲक्सिस बँकेशी करार करण्यात आला आहे.
Update: Paytm QR, Soundbox, Card machine will continue to work as always even beyond March 15, confirms RBI. We have also shifted nodal account to @AxisBank (by opening an Escrow Account) to continue seamless merchant settlements as before
— Paytm (@Paytm) February 16, 2024
More details here:… pic.twitter.com/lBTq7DgDbD
नोटाबंदीनंतर पेटीएमला मोठा नफा झाला होता
पेटीएम ही देशातील QR आणि मोबाईल पेमेंट क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. नोटाबंदीनंतर पेटीएमने या क्षेत्रात मोठा नफा कमावला होता. कंपनीने करोडो व्यापाऱ्यांसोबत भागीदारी करून डिजिटल पेमेंटचे मोठे नेटवर्क तयार केले होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व प्रकारचे ग्राहक त्याच्याशी जोडले गेले. पण पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने केलेल्या कारवाईमुळे त्याला मोठा धक्का बसला आहे.
ही बातमी वाचा: