PAN Aadhaar Link : आधार कार्ड पॅनशी लिंक केलं? आजच करा, नाहीतर भरावा लागेल हजार रुपयांचा दंड
Aadhar Card PAN Link : आधार क्रमांक पॅनशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे. त्यानंतर तुम्हाला दंड भरावा लागेल.
PAN-Aadhaar Link : तुम्ही तुमचं आधार कार्ड (Aadhaar Card) पॅन कार्ड (PAN Card) सोबत लिंक केलं आहे का? नसेल तर लवकर आधार-पॅन लिंक करा. पॅन कार्ड (PAN Card) आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. त्यामुळे आधार-पॅन लिंक करण्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक आहेत. 1 एप्रिलपासून पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक असणे अनिवार्य करण्यात आलं आहे. जर तुम्ही 31 मार्च आधी हे लिंक शकला नाहीत तर तुम्हांला 1 एप्रिल 2023 पासून तुम्हाला लिंक करण्यासाठी दंड भरावा लागेल. त्यामुळे ज्यांनी आत्तापर्यंत आधार कार्ड पॅन कार्डला लिंक केलं नसेल, त्यांनी हे काम आजच करुन घ्या. शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका.
पॅन - आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च
जर तुम्ही आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केलं नाही तर, तुमचे पॅन कार्ड काहीही उपयोगाचं ठरणार नाही. आर्थिक कामांसाठी पॅनकार्ड हे अतिशय महत्त्वाचं दस्तऐवज आहे, त्याशिवाय अनेक कामे होऊ शकत नाहीत. विशेषत: रिटर्न आणि आयकर भरण्याशी संबंधित कोणतेही काम पॅनकार्डशिवाय करता येत नाही. त्यामुळे लगेचच पॅन-आधार लिंक करा. 31 मार्च नंतर आधार-पॅन लिंक करण्यासाठी 1000 रुपयांचा दंड भरावा लागेल.
पॅन-आधार लिंक नसेल तर काय होईल?
जर पॅन आधारशी लिंक नसेल तर आयकर रिटर्न मिळणार नाही. तसेच तुम्ही पॅन कार्ड वापरू शकणार नाही आणि दुसरे पॅन कार्ड बनवू शकत नाही. पॅन कार्ड नसेल तर आर्थिक कामांमध्ये अडचणी येतील.
How to Link PAN-Aadhaar : आधार कार्ड पॅन कार्डसोबत कसं लिंक कराल?
आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही लिंक आधार पर्याय निवडा. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा 10 अंकी पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल आणि त्यानंतर आधार कार्डवर असलेलं नाव टाकावं लागेल. वरील सर्व माहिती अचूक भरल्यानंतर त्याखाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून 'लिंक आधार' या पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर लगेच तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक होईल. तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
PAN Card : पॅनकार्डबाबत आयकर विभागाची तातडीची सूचना; उशीर करु नका अन्यथा...