एक्स्प्लोर

एकीकडं विश्वचषकात धक्का, दुसरीकडं पाकिस्तानातून वाईट बातमी समोर; विमान प्रवास होणार बंद?

पाकिस्तानसाठी सध्या निराजनक घटना घडत आहेत. एकीकडं विश्वचषकांच्या सामन्यात पराभव होत असताना दुसरीकडे पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

Pakistan : पाकिस्तानसाठी सध्या निराजनक घटना घडत आहेत. एकीकडं विश्वचषकांच्या सामन्यात पराभव होत असताना दुसरीकडे पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानमधील इंधन टंचाई आणि आर्थिक संकट अधिक गडद होताना दिसत आहे. पाकिस्तानी विमान कंपन्यांच्या व्यवसायावर याचा वाईट परिणाम झाला आहे. डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA) बंद होण्याच्या मार्गावर आहे. कारण निधीच्या समस्येमुळं गेल्या 10 दिवसांत 300 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान स्टेट ऑइल (पीएसओ) ने थकबाकी न भरल्यामुळे इंधन पुरवठा कमी केला आहे. त्यामुळे PIA ने 14 ऑक्टोबरपासून 322 उड्डाणे रद्द केली आहेत.  त्यापैकी 134 आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणे होती. पाकिस्तानसाठी ही निराजनक घटना आहे. मंगळवारी PIA ने 21 देशांतर्गत उड्डाणांसह 51 उड्डाणे रद्द केली होती.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था डळमळीत 

मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने डॉन न्यूजला सांगितले की व्यवस्थापन पर्यायी फ्लाइटमध्ये प्रवाशांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक दशकांच्या गैरव्यवस्थापनामुळे आणि अस्थिरतेने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला अडथळा आणला आहे. या वर्षी इस्लामाबादला डिफॉल्ट टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून आणखी एक बेलआउट घ्यावा लागला.

PIA वर किती कर्ज आहे?

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सरकारी मालकीच्या कंपन्यांसाठी व्यापक खासगीकरण योजनेचा भाग म्हणून एअरलाइन विकणार आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, PIA वर 743 अब्ज रुपये (सुमारे 2.5 बिलियन डॉलर) कर्ज आहे. जे त्याच्या एकूण मालमत्तेपेक्षा पाचपट जास्त आहे. PIA 1955 मध्ये अस्तित्वात आली होती. जेव्हा सरकारने तोट्यात चाललेल्या व्यावसायिक विमान कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले होते. 1990 पर्यंत वेगाने वाढ झाली. बाजाराचे उदारीकरण आणि अनेक खासगी आणि सार्वजनिक मालकीच्या एअरलाईन्सच्या लॉन्चमुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सवर प्रचंड दबाव आला आहे. ज्यामुळे वर्षानुवर्षे तोटा सहन करावा लागत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

अफगाणिस्तानचा वार जिव्हारी, पाकिस्तानचं विश्वचषकातील आव्हान संपलं? अजून किती संधी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget