Paisa Zala Motha : एसआयपीची चलती कशामुळे? गुंतवणूक करताना काय काळजी घ्या? पाहा गुंतवणूक सल्लागार काय सांगतात
Paisa Zala Motha : एसआयपची चलती कशामुळे? या सह एसआयपी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी अशा विविध प्रशांची उत्तरे गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक यांनी एबीपी माझाच्या पैसा झाला मोठा या कार्यक्रमात दिली.
Paisa Zala Motha : एसआयपी (SIP ) हा सर्वात सोपा आणि सुलभ मार्ग आहे. गेल्या काही काळात शेअर बाजारात तेजी आहे. त्यामळे एसआयपीतून मिळणारा परतावा देखील चांगला आहे. जीएसटी नोटबंदीमुळे रोकडचं प्रमाण कमी झाल्यामुळे बॅंकेतच पैसे ठेवण्याला प्राधान्य दिलं जात आहे. यातूनच बचत करण्याकडे लोकांचा कल आहे. या सर्व कारणांमुळे आलीकडच्या काळात एसआयपीची चलती आहे, अशी माहिती गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक यांनी दिली.
एसआयपीच्या गुंतवणुकीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. त्यामुळे एसआयपीचा पर्याय गुंतवणुकीसाठी जास्त प्रमाणात वापरला जात आहे. परंतु, एसआयपीमध्ये गुंतवणूक करत असताना देखील गुंतवणूकदारांना काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळेच एसआयपची चलती कशामुळे? या सह एसआयपी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी अशा विविध प्रशांची उत्तरे निखिल नाईक यांनी एबीपी माझाच्या पैसा झाला मोठा या कार्यक्रमात दिली.
निखिल नाईक यांनी यावेळी एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी याबाबत देखील माहिती दिली. एसआयपी म्हणजे जादूची कांडी नाही. एसआयपी करत असताना योग्य सल्लागार निवडणं आवश्यक आहे. एसआयपी किती कालावधीसाठी करणार आहात यानुसार गुंतवणूक करायची आहे. एक-दोन वर्षांसाठी एसआयपी करायची असेल तर लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक करता येते. चार वर्षांसाठी करातयची असले तर बॅलन्स फंडमध्ये एसआयपी करता येते. याबरोबरच सात-आठ वर्षांचा कालावधी असेल तर ईक्विटी फंडचा विचार करावा, असे निखिल नाईक यांनी सांगितले.
किती गुंतवणूक करावी?
एसआयपीमध्ये किती प्रमाणात गुंतवणूक करावी? याबाबत देखील निखील नाईक यांनी माहिती दिली. करियरच्या सुरूवातीला उत्पन्नातील 25 ते 30 रक्के रक्कम एसआयपीसाठी वापरावी. कारण या वयात जबाबदाऱ्या कमी असतात. त्यानंतर वयाच्या 40 च्या आसपास जबाबदाऱ्या वाढत असतात. अशावेळी 20 टक्केच्या आसपास रक्कम एसआयपीसाठी वापरावी. त्यानंतर वयाच्या 45 च्या आसपास बऱ्यापैकी सेटल झालेले असतात आणि आपले उत्पन्न देखील वाढलेले असते. अशा वेळी उत्पन्नतील 40 टक्के रक्कम एसआयपीसाठी गुंतवणूक करू शकतात, अशी माहिती निखिल नाईक यांनी दिली.
एसआयपी बंद देखील करता येते
आर्थिक अडचणीमुळे एसआयपी बंद करता येते. शिवाय आपल्याला आवश्यता असताना पैसे देखील काढून घेता येतात. फक्त आपण जी रक्कम काढणार आहोत त्या हप्पत्याला किमान एक वर्ष झालेले असावे अन्यथा त्याच्यावर एक्झीटचे पसै लागू शकतात. याबरोबरच आर्थिक अडचणीमुळे काही काळासाठी पैसे भरणे थांबवता देखील येतात, अशी माहिती निखिल नाईक यांनी दिली.