एक्स्प्लोर

ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी खुशखबर! पेमेंट मर्यादा वाढवली, 'या' तारखेपासून नवीन नियम लागू

ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. केंद्र सरकारनं नवीन वर्षात मोठी भेट दिली आहे. ऑनलाइन पेमेंटची मर्यादा वाढवली आहे.

UPI Payment : ऑनलाइन पेमेंट (Online UPI payment) करणाऱ्यांना केंद्र सरकारने (Central Govt) नवीन वर्षात मोठी भेट दिली आहे. सध्या, सर्वत्र ऑनलाइन पेमेंटचा भरपूर वापर केला जात आहे. परंतू, ऑनलाइन पेमेंट सुलभ करण्यात एक मोठी समस्या होती ती म्हणजे निर्धारित मर्यादा. सरकारने एका दिवसात 1 लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर बंदी घातली होती. मात्र,  आता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने म्हणजेच RBI ने या समस्येवर उपाय शोधला आहे. आता 5 लाख रुपयांचे UPI पेमेंट एकावेळी करता येणार आहे. मात्र, यामध्ये काही अटी आहेत. ज्या सर्व वापरकर्त्यांना माहित असणं आवश्यक आहे.

एकाच वेळी 5 लाख रुपयांचे UPI पेमेंट करता येणार

ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. केंद्र सरकारनं नवीन वर्षात मोठी भेट दिली आहे. आता एकाच वेळी 5 लाख रुपयांचे UPI पेमेंट करता येणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने या समस्येवर उपाय शोधला आहे. आता तुम्ही हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांसाठी 5 लाख रुपयांचे ऑनलाइन पेमेंट करू शकाल.

मर्यादा 1 लाख रुपयांवरुन 5 लाखांपर्यंत वाढवली

एनपीसीआयने रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसारख्या अत्यावश्यक संस्थांच्या पेमेंटसाठी एकावेळी 5 लाख रुपयांच्या ऑनलाइन पेमेंटमध्ये सूट दिली आहे. हा नवा नियम 10 जानेवारीपासून लागू होणार आहे. यानंतर, वापरकर्ते सर्व शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांचे बिल भरण्यासाठी एकावेळी जास्तीत जास्त 5 लाख रुपये भरू शकतील. यासाठी एनपीसीआयने बँका आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना अॅडव्हायजरी जारी केली आहे.

पेमेंट मर्यादा वाढवली

NPCI द्वारे व्यापाऱ्यांसाठी 1 लाख ते 5 लाख रुपयांची देय मर्यादा लागू केली जाईल. व्यापाऱ्याने वाढीव मर्यादेसह पेमेंट मोड म्हणून UPI ​​सक्षम करणे आवश्यक आहे. सध्या, नॅशनल पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया (NPCI) द्वारे UPI पेमेंट मर्यादा 1 लाख रुपये प्रतिदिन ठेवली आहे. मागील पतधोरण आढावा बैठकीत RBI ने 5 लाख रुपये पेमेंट मर्यादा प्रस्तावित केली होती. यामुळे Paytm, Google Pay आणि PhonePe सारख्या पेमेंट अॅप्सना फायदा होईल.

UPI पेमेंटमध्ये भारत आघाडीवर 

जर आपण UPI पेमेंटबद्दल बोललो तर, 2023 मध्ये भारत UPI पेमेंटच्या बाबतीत 100 अब्जचा टप्पा पार करेल. या संपूर्ण वर्षात 118 अब्ज रुपयांची UPI पेमेंट करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये 60 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

UPI Tap And Pay : QR कोडला सुट्टी मिळणार! UPI टॅप अँड पे सेवा जानेवारीत सुरू होणार, जाणून घ्या कसे काम करेल?

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
JIO IPO: जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget