आता झोमॅटो, स्विगीवरून खाद्यपदार्थ मागवणं महागणार, चार्जेसमध्ये तब्बल 20 टक्क्यांनी वाढ!
ऑनलाईन फूड ऑर्डर करणं आता महागणार आहे. कारण झोमॅटो आणि स्विगीने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे फूड ऑर्डर करताना खिशाला झळ बसणार आहे.
मुंबई : आजकाल ऑलाईन पद्धतीने जेवण मागवण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. जेवण बनवण्याचा कंटाळा आला की लगेच हातातील मोबाईलच्या मदतीने जेवणाची ऑर्डर दिली जाते. झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) या ऑनलाईन जेवणाच्या ऑर्डर पुरवणाऱ्या दिग्गज कंपन्या आहेत. या क्षेत्रात या दोन कंपन्यांची मक्तेदारी आहे. दरम्यान, एका झटक्यात ऑनलाईन फूड ऑर्डर करणं चांगलंच महागणार आहे. कारण झोमॅटो आणि स्वीगी या दोन्ही फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सने आपले डिलिव्हरी चार्चेस तब्बल 20 टक्क्यांनी वाढवले आहेत. या निर्णयामुळे आता ऑनलाईन फूड मागवणाऱ्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.
खाद्यपदार्थ ऑर्डर करणे महागणार
स्वीगी आणि झोमॅटो या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून खाद्यपदार्थ ऑर्डर करणे आता महागणार आहे. कारण या दोन्ही कंपन्यांनी प्रत्येक ऑर्डरसाठीचे चार्जेस 20 टक्क्यांनी वाढवले आहेत. आता या दोन्ही कंपन्या प्रत्येक ऑर्डसाठी सहा रुपये घेणार आहेत. याआधी प्रत्येक ऑर्डरसाठी या दोन्ही कंपन्या पाच रुपये घ्यायच्या. वाढीव चार्जेस बंगळुरू, दिल्ली या ठिकाणी सध्या हा निर्णय लागू केला जाणार आहे.
प्लॅटफॉर्म फी म्हणजे नेमकं काय?
स्विगी आणि झोमॅटो या दोन्ही कंपन्यांनी गेल्या वर्षापासून प्लॅटफॉर्म फी घेणं चालू केलं आहे. ही फ्लॅटफॉर्म फी अगोदर दोन रुपये होती. प्लॅटफॉर्म फी अशा कंपन्यांसाठी गरजेची आहे. नफा वाढवण्यासाठी ही फी आकारली जाते. प्रत्येक ऑर्डवर घेतले जाणारे चार्जेस म्हणजेच प्लॅटफॉर्म फी आहे.
प्लॅटफॉर्म फी वाढवण्याचं नेमकं कारण काय?
स्विगी आणि झोमॅटोकडून नफावाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या कंपन्यांनी आपल्या प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ केली आहे. जाहिरातीच्या माध्यमातूनही या कंपन्यांना काही प्रमाणात महसूल मिळतो. रेस्टॉरंट्सकडून मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ करण्याची संधी या कंपन्यांना दिसत नाहीये. यामुळेच ग्राहकांकडून घेतल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्म फीमध्ये या कंपन्यांनी वाढ केली आहे.
हेही वाचा :
आयटीआर भरताना येतायत अडचणी, ITR फायलिंगची शेवटची तारीख वाढणार?
SIP की PPF दोन्हीपैकी कोण सर्वोत्तम? जाणून घ्या गुंतवणुकीचा सर्वांधिक चांगला पर्याय कोणता?
फॉर्म-16 ते टीडीएस, आयटीआर भरण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची गरज? जाणून घ्या सविस्तर....