Hyundai IPO: पैसे तयार ठेवा, ह्युंदाईचा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार,गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Hyudai IPO: देशातील दुसऱ्या क्रमांकाची कार निर्मिती क्षेत्राती कंपनी असलेल्या ह्युंदाईचा आयपीओ पुढील आठवड्यात येणार आहे. गुंतवणूदारांसाठी या आयपीओच्या माध्यमातून कमाईची मोठी संधी आहे.
मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर आयपीओ लिस्ट झाले. या आयपीओंनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला. बजाज हाऊसिंग फायनान्स, पीएनजी ज्वेलर्स, प्रिमियम एनर्जीज, केआरएन हीट एक्सेंजर्स, यूनिकॉमर्स ई सोल्यूशन्स या कंपन्यांच्या आयपीओंनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा मिळाला. आता शेअर बाजारात पुढील आठवड्यात ह्युंदाई कंपनीचा आयपीओ येणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून ह्युंदाई 25 हजार कोटी रुपये उभारणार आहे.
ह्युंदाईचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी 15 ऑक्टोबरला खुला होणार आहे. हा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी तीन दिवस खुला असेल. भारतीय शेअर बाजारातील ह्युंदाईचा आयपीओ सर्वात मोठा आहे. एलआयसीनं 2022 मध्ये आयपीओच्या माध्यमातून 21008 कोटी रुपये उभारले होते. त्यापेक्षा ह्युंदाईचा आयपीओ मोठा आहे. या आयपीओला सबस्क्राईब करण्याची मुदत 17 सप्टेंबरपर्यंत असेल.
ह्युंदाई कंपनी या आयपीओसाठी प्राईस बँड निश्चित केलं आहे. 1865 ते 1960 रुपयांदरम्यान या शेअरचं मूल्य निश्चित करण्यात आलं आहे. एका लॉटमध्ये 7 शेअर्स असतील. या आयपीओच्या माध्यमातून ह्युंदाई कंपनीचं मूल्य 10 पट वाढणार आहेत.या आयपीओच्या माध्यमातून ह्युंदाई ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून 14.2 कोटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे.
आयपीओ कधी खुला होणार?
रिटेल गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये 15 ऑक्टोबरला गुंतवणूक करता येईल. तर, अँकर इन्व्हेस्टर्सला 14 ऑक्टोबरपासून गुंतवणूक करा येईल. यामध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 50 टक्के शेअर्स राखीव असतील. संस्थात्मक गुंतवणूकदार नसणाऱ्यांसाठी 15 टक्के तर रिटेल गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के कोटा राखीव आहे.
ह्युंदाईच्या एका शेअरची दर्शनी किंमत 10 रुपये निश्चित करण्यात आली आहे. कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांना आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असल्यास 186 रुपयांची सूट प्रति शेअर मिळणार आहे. या कंपनीनं आयपीओसाठी जून महिन्यात सेबीकडे कागदपत्रं जमा केली होती. त्यांनंतर सेबीकडून त्यांना गेल्या महिन्यात मंजुरी देण्यात आली होती.
ह्यंदाई ही भारतातील कार उत्पादन क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. दुसऱ्या क्रमांकाची निर्यातदार कंपनी देखील आहे. भारतीय बाजारपेठेत मारुती सूझुकी ही कार निर्मिती क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांचा वाटा 41.7 टक्के असून ह्युंदाईचा वाटा 14. 5 टक्के आहे. तर, टाटा मोटर्स तिसऱ्या स्थानावर असून त्यांचा वाटा 13.8 टक्के आहे.
दरम्यान, आयपीओच्या माध्यमातून 2024 मध्ये 62 कंपन्यांनी 64510 कोटी रुपयांची उभारणी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत आयपीओच्या माध्यमातून कंपन्यांनी यावर्षी 15 हजार कोटी जा उभारले आहेत. कोटक इनव्हेस्टमेंट्स बँकिंग, सिटी एसएसबीसी, जेपी मॉर्गन अँड मॉर्गन स्टॅनली हे ह्युंदाईच्या आयपीओचे मॅनेजर्स असतील.
इतर बातम्या :
आरबीआय पतधोरण जाहीर करणार, व्याज दर वाढणार की कमी होणार, जागतिक घडामोडी प्रभावी ठरणार