(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतातील पहिला अब्जाधीश कोण होता? नेमकी किती होती संपत्ती? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Indias first Billionaire : आजच्या घडीला देशात अनेक अब्जाधिश आहेत. मोठ्या प्रमाणात संपत्ती त्यांच्याकडे आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का? की देशातील पहिला अब्जाधिश (Indias first Billionaire) कोण होता?
Indias first Billionaire : आजच्या घडीला देशात अनेक अब्जाधिश आहेत. मोठ्या प्रमाणात संपत्ती त्यांच्याकडे आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का? की देशातील पहिला अब्जाधिश (Indias first Billionaire) कोण होता? तर मीर उस्मान अली खान (mir osman ali khan) असं भारतातील पहिल्या अब्जाधिशाचं नाव आहे. आपण कल्पनाही करु शकत नाही एवढी त्यांची संपत्ती होती. जाणून घेऊयात त्यांच्या संपत्तीबद्दल सविस्तर माहिती.
मीर उस्मान अली खान यांची एकूण संपत्ती किती?
एक काळ असा होता की भारतातू सोन्याचा धूर निघतोय असं म्हटलं जायचं. मोठ्या प्रमाणात साधन संपत्ती देशात होती. त्याकाळी मीर उस्मान अली खान हा सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. तो भारतातील पहिला अब्जाधिश होता. तो हैदराबादचा शेवटचा निजाम होता. त्यांची एकूण संपत्ती ही 230 अब्ज डॉलर म्हणजेच 1910987 कोटी रुपये होती. उस्मान अली खानची जगभर प्रसिद्धी होती. ईस्ट इंडिया कंपनीने कंपनीनं त्यांना भारतातील पहिले अब्जाधीश म्हणून सन्मान दिली होता.
एकमेव हिऱ्याचे पुरवठादार
मीर उस्मान अली खान यांची एकूण संपत्ती ही अमेरिकेच्या जीडीपीच्या 2 टक्के होती. मिळालेल्या माहितीनुसार उस्मान अली खान यांच्या संपत्तीचा मुख्य स्त्रोत हा गोवळकोंडा खाणीमधून आला होता. त्या काळात मीर उस्मान अली खान हे एकमेव हिऱ्याचे पुरवठादार होते. 1724 ते 1948 पर्यंत म्हणजेच 224 वर्षे हैदराबादवर निजामांनी राज्य केलं. या निजामांच्या इतिहासात आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. आलिशान जीवनशैली आणि कलेची आवडीसाठी मीर उस्मान अली खान हे प्रसिद्ध होते.
50 रोल्स रॉइसचे मालक
मिळालेल्या माहितीनुसार, मीर उस्मान अली खान यांच्याकडे वेगवेगळ्या आलीशान गाड्या होत्या. त्यांच्याकडे 50 रोल्स रॉयसेस होत्या. ते 1000 कोटी रुपयांचे हिरे वापरत होते. तसेच एक खासगी विमान कंपनी, 400 दशलक्ष पौंड किमतीचे दागिन्यांचे दुकानही त्यांच्याकडे होते. त्यांच्याकडे कोह-इ-नूर, होप, दर्या-इ नूर, नूर-उल-ऐन, प्रिन्सी, रीजेंट आणि विटेल्सबॅक हिऱ्यांसह अनेक अत्यंत मौल्यवान हिरे होते. विशेष म्हणजे एवढी संपत्ती असूनही मीर उस्मान अली खानची कंजूष म्हणून ओळख होती. मीर उस्मान अली खान हा हैदराबादचा शेवटचा निजाम होता. तो वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैलीसाठी ओळखला जायचा. उस्मान अली खानला गाड्यांचा प्रचंड छंद होता.
महत्वाच्या बातम्या:
जगातील सर्वात वृद्ध अब्जाधीश कोण? वय आहे 102, संपत्ती पाहून व्हाल थक्क