(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jio World Convention Centre: नीता अंबानींने लॉन्च केलं भारतातील सर्वात मोठं कन्वेंशन सेंटर; जाणून घ्या खास गोष्टी
रिपोर्टनुसार, जियो वर्ल्ड सेंटर उभारण्याची संकल्पना नीता अंबानी (Nita Ambani) यांनी मांडली.
Jio World Convention Centre : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डायरेक्टर आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी देशातील सर्वात मोठे कन्वेंशन सेंटर लॉन्च केले आहे. मुंबईमधील बांद्रा कुर्ला परिसरामध्ये हे ‘जियो वर्ल्ड सेंटर’उभारण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, हे जियो वर्ल्ड सेंटर उभारण्याची संकल्पना नीता अंबानी (Nita Ambani) यांनी मांडली. 2023 मध्ये होणाऱ्या इंटरनेशनल ऑलिम्पिकची बैठक ही या कन्वेंशन सेंटरमध्ये होणार आहे. जाणून घेऊयात या कन्वेंशन सेंटरच्या खास गोष्टी...
- पाच एकरमध्ये हे कन्वेंशन सेंटर उभारण्यात आलं आहे.
- 10,640 लोकांची बैठक व्यवस्था या कन्वेंशन सेंटरमध्ये होऊ शकतो.
- 5 जीचा वापर तुम्ही या कन्वेंशन सेंटरमध्ये करू शकता.
- एक लाख 61 हजार चौफूटपेक्षा जास्त क्षेत्रफळात तयार करण्यात आलेले तीन प्रदर्शन हॉल या सेंटरमध्ये आहेत. या कन्वेंशन सेंटरमध्ये पाच हजार कार पार्किंगची व्यवस्था आणि 18 हजार लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे.
- 3200 पाहुणांसाठी बॉलरूम आणि 25 मिटींग रूमची व्यवस्था देखील या कन्वेंशन सेंटरमध्ये केली जाणार आहे.
जियो वर्ल्ड सेंटर एक असे केंद्र होईल जिथे आपण एकत्र मिळून भारताचा विकास करू: नीता अंबानी
नीता अंबानी यांनी सांगितलं, 'जियो वर्ल्ड सेंटर हे नवीन भारताच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. सर्वात मोठे मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रीमियम रिटेलिंग आणि जेवणाच्या सुविधा इत्यादी गोष्टींचे आयोजन या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये केलं जाणार आहे. हे जियो वर्ल्ड सेंटर एक असे केंद्र होईल जिथे आपण एकत्र मिळून भारताचा विकास करू'
‘जियो वर्ल्ड कन्वेशन सेंटर’ हा जियो वर्ल्ड सेंटरचा एक भाग आहे. धीरूभाई अंबानी स्क्वेअर आणि म्युझिकल 'फाउंटन ऑफ जॉय' हे या सेंटरच्या सुरुवातीच्या टप्प्यात उघडण्यात आले. मुंबईचे प्रीमियम रिटेल डेस्टिनेशन जिओ वर्ल्ड ड्राइव्हचे उद्घाटन गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये करण्यात आले होते. सर्व्हिस अपार्टमेंट आणि ऑफिसेससह सांस्कृतिक केंद्र,म्यूझिकल फाऊंटन, दुकाने, कॅफे आणि रेस्टॉरंट्स अशा सर्व सुविधा असलेले हे भारतातील पहिले कन्व्हेन्शन सेंटर आहे. जियो वर्ल्ड सेंटरमधील धीरूभाई अंबानी स्क्वेअर हे पर्यटकांसाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वसामान्य लोकांना प्रवेश मोफत असेल. यासाठी फ्री पास तुम्ही dhirubhaiambanisquare.com या वेब साइटवरून घेऊ शकता. पाण्याचे कारंजे, लाइट्स आणि संगीत यांच्या अप्रतिम समन्वयाने तयार केलेले फाउंटन ऑफ जॉयचे संगीतमय प्रदर्शन तुम्ही पाहू शकाल. यात आठ फायर शूटर, 392 वॉटर जेट्स आणि 600 हून अधिक एलईडी लाइट्स आहेत, जे संगीताच्या तालावर थिरकतात.
फाउंटन ऑफ जॉयच्या लोकार्पण सोहळ्यात नीता आंबानी यांनी सांगितले, 'अभिमानानं आणि आनंदानं धीरूभाई अंबानी स्क्वेअर आणि फाउंटेन ऑफ जॉय हे मुंबईमधील तसेच मुंबईच्या बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी खुले करत आहोत.'
इतर महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar : आक्षेप नाही, मात्र अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी येतायत : शरद पवार
- Pune Metro: पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर; 'या' दोन मेट्रो मार्गिकांचं उद्घाटन करणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha