Pune Metro: पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर; 'या' दोन मेट्रो मार्गिकांचं उद्घाटन करणार
Pune news : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) उद्या पुणे दौऱ्यावर आहेत. दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करणार मोदींच्या हस्ते होणार आहे.
Pune PM Narendra Modi Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान मोदी उद्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करणार आहेत. त्यातील एक मार्ग आहे वनाझ ते रामवाडी या दरम्यानचा आहे. हा मार्ग 13 किलोमीटरचा असून त्यापैकी वनाझ ते गरवारे हा पाच किलोमीटरचा मार्ग तयार झाला आहे, त्याचे उद्या उद्घाटन होत आहे. तर दुसरा मार्ग आहे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट. हा मार्ग 12 किलोमीटरचा असून त्यापैकी पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या सात किलोमीटरचे काम पूर्ण झालं आहे.पंतप्रधान मोदी रविवारी पुणे मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन आणि मेट्रोने आनंदनगपर्यंतचा प्रवास करणार आहेत. उद्या मोदी पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या मार्गाचेही उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान मोंदीच्या हस्ते उद्या नदी सुधार प्रकल्पाचं देखील उद्घाटन होणार आहे.
Prime Minister Narendra Modi to flag off Pune Metro on March 6
— ANI (@ANI) March 5, 2022
"The project will provide world-class infrastructure for urban mobility in Pune; the foundation stone of this project was laid by PM in 2016," Prime Minister's Office said in a statement
(File pic) pic.twitter.com/oIjyWK9V3U
शरद पवार यांनी लगावला टोला
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या उद्घाटन कार्यक्रमावरुन टोला लगावला आहे. मेट्रोच्या अर्धवट कामाचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान उद्या पुण्यात येत आहेत असं पवारांनी म्हटलं आहे. पुणे महापालिकेनं उभारलेल्या सुभद्राबाई बराटे रुग्णालयाचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना पवारांनी पंतप्रधानांच्या उद्याच्या दौऱ्यावर भाष्य केलं. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असलेल्या नदी सुधार प्रकल्पावरही त्यांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. त्यात काही त्रुटी असतील तर पंतप्रधानांचा दौरा झाल्यानंतर सरकार आणि महापालिकेशी बोलू असं पवार म्हणाले. अर्धवट कामांच्या उद्घाटनापेक्षा युक्रेनवरून विद्यार्थ्यांना परत आणण्याची अधिक गरज आहे, असं शरद पवार म्हणाले.पंतप्रधानांचे आपण स्वागत करुया कारण ते देशाचे प्रमुख आहेत. पण उद्या काही अडचण आली तर ती आपल्यालाच निस्तरावी लागणार आहे, असंही पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
Sharad Pawar : आक्षेप नाही, मात्र अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी येतायत : शरद पवार