सायकलवरुन विक्री ते 17 हजार कोटींची उलाढाल, 'या' वॉशिंग पावडर कंपनीचा विस्तार आज केवळ 6 टक्केच का?
Nirma Washing Powder Owner Story : देशभरात एकेकाळी 10 घरांपैकी 6 घरांमध्ये निरमा वॉशिंग पावडर वापरली जात असे. तीच वॉशिंग पावडर आता घराघरांतून आऊटडेटड झाली आहे का?
Nirma Washing Powder Owner Story : देशभरात एकेकाळी 10 घरांपैकी 6 घरांमध्ये निरमा वॉशिंग पावडर वापरली जात असे. तीच वॉशिंग पावडर आता घराघरांतून आऊटडेटड झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण करसन भाई पटेल यांच्या यशाचं शिखर कोणेएकेकाळी अवकाशापर्यंत पोहोचलं होतं.एका सायकलवरुन सुरु केलेली उत्पादन विक्रीने थेट १७ हजार कोटीपर्यंतचा पल्ला गाठला होता. देशभरात एफएमसीजी कंपन्यांनीही ज्यांनी टक्कर दिली तीच कंपनी आज कच खात असल्याचं पाहायला मिळतंय. जवळपास 60 टक्के वॉशिंग पावडर मार्केटमध्ये विस्तार असणाऱ्या
उत्पादनाचा विस्तार सुमारे ६ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
गुजरातमधून कंपनीची सुरुवात
निरमा वॉशिंग पावडर या कंपनीचा पूर्णपणे गुजरातमध्ये घातला गेला आणि जाहिरातीतून लोकांच्या भावनेलाही हात घातला गेला. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील करसन भाई पटेल यांना सुरुवातीपासूनच काहीतरी करण्याची इच्छा होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अहमदाबादमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम केलं, परंतु लवकरच त्यांना गुजरात सरकारच्या खनिकर्म आणि भूविज्ञान विभागात सरकारी नोकरी मिळाली. सरकारी नोकरी असूनही करसनभाईंना काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. या दरम्यान त्यांची मुलगी निरुपमा हिचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यांचा जीव हादरला. अचानक घडलेल्या अपघाताने ते पूर्णपणे तुटून गेले होते.आपल्या मुलीने जगभर प्रसिद्धी मिळवावी अशी त्यांची इच्छा होती,पण ते शक्य राहिलं नव्हतं. पण त्यांनी हार मानली नाही, या भावनेला त्यांनी पॅशन बनवलं आणि आपल्या मुलीच्या नावाने डिटर्जंट उत्पादनं बनवण्यास सुरुवात केली.
आणि करसन भाईचा पराक्रम...
करसन भाई निरमाच्या नावाने उत्पादनं बनवू लागले. पण बाजारात असलेल्या HUL सारख्या मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणे कठीण होते.त्यासाठी त्यांनी नवनवीन रणनीती अवलंबली. प्रत्येक पॅकेटवर लिहायला सुरुवात केली – कपडे स्वच्छ नसल्यास पैसे परत.. लोकांनी हे पसंत पडू लागलं आणि लोकांकडून खरेदी सुरु झाली आणि दर्जेदार उत्पादनाने आत्मविश्वास निर्माण केला. लवकरच त्यांच्या उत्पादनाची मागणी वाढू लागली. व्यवसायात झालेली वाढ पाहून करसनभाईंनी सरकारी नोकरी सोडून बाजाराकडे पूर्ण लक्ष द्यायला सुरुवात केली.
बाजार धोरणाचे आश्चर्य
सुरुवातीपासूनच,करसनभाईंना आपलं उत्पादन लोकांपर्यंत नेण्यासाठी आश्चर्यकारक कल्पना येत होत्या. त्यांनी त्यांच्या कारखान्यात काम करणार्या कामगारांना सांगितले की,त्यांच्या पत्नींनी दररोज दुकानात जाऊन निरमा वॉशिंग पावडर मागावी. त्यामुळे या उत्पादनाची मागणी दुकानदारांकडे येऊ लागली आणि पावडरची विक्री वाढली.विशेषत:मध्यमवर्गाला लक्ष्य करणारे हे उत्पादन जाहिरातींसाठीही ओळखलं जाऊ लागलं. सबकी पासंद निरमा… सारख्या जाहिराती प्रत्येक घराघरात आवडल्या होत्या. निरमा गर्लनेही हे उत्पादन खूप प्रसिद्ध केले. 2010 पर्यंत निरमाचा बाजारातील हिस्सा सुमारे 60 टक्क्यांवर पोहोचला होता.
2005 पर्यंत निरमा ही एक ब्रँड कंपनी बनली आणि शेअर बाजारात लिस्ट झाली. वॉशिंग पावडर क्षेत्रातील वाढती स्पर्धा पाहून कंपनीने इतर क्षेत्रातही गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. सिमेंट कंपनी बनवली,जी देशात पाचव्या क्रमांकावर आहे. निरमा विद्यापीठ आणि रसायनाचा व्यवसायही सुरू केला.
जाहिरातीत चूक
महिलांना टार्गेट करून जाहिराती दाखवणाऱ्या कंपनीला अचानक काय वाटलं कोण जाणे, नावीन्यपूर्णतेच्या नावाखाली महिलांऐवजी पुरुषांनी कपडे धुण्याच्या जाहीरातीची त्यांनी सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ,निरमा,जी हेमा मालिनीसह 4 दिग्गज बॉलीवूड अभिनेत्रींची जाहिरात करत होती,तिने यावेळी हृतिक रोशनला आपला ब्रँड अॅम्बेसेडर बनवले. या चुकीमुळे त्याचे उत्पादन महिलांशी जोडले जाऊ शकले नाही आणि बाजाराबाहेर गेले. त्याचा हिस्सा 60 टक्क्यांवरून 6 टक्क्यांवर आला आहे.पण, कंपनी म्हणून निरमा अजूनही एक मौल्यवान ब्रँड आहे.शुक्रवारी कंपनीच्या शेअरची किंमत 255.55 रुपये होती.