नवीन कॉन्टॅक्टलेस Rupay क्रेडिट कार्ड, पेट्रोलपासून ते किराणा सामान पर्यंत सगळ्यावर सवलत
रेल्वे प्रवास, किराणा सामानापासून पेट्रोल ते डिझेल पर्यंत खरेदी करणाऱ्यांसाठी पैसे वाचवणारं किंबहुना सवलत देणारं क्रेडिट कार्ड बाजारात सादर करण्यात आलं आहे.
IRCTC & BOB : रेल्वे प्रवास, किराणा सामानापासून पेट्रोल ते डिझेल पर्यंत खरेदी करणाऱ्यांसाठी पैसे वाचवणारं किंबहुना सवलत देणारं क्रेडिट कार्ड बाजारात सादर करण्यात आलं. भारतीय रेल्वे कंपनी आयआरसीटीसी आणि बँक ऑफ बडोदा फायनान्शियल (BoB वित्तीय - बँक ऑफ बडोदाची उपकंपनी) यांनी संयुक्तपणे नवीन संपर्करहित RuPay क्रेडिट कार्ड सादर केले आहे. मोठ्या संख्येने ग्राहक असलेल्या दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांसाठी या कार्डामुळे अनेक फायदे उपलब्ध होणार आहेत. या कार्डद्वारे आंतरराष्ट्रीय व्यापारी आणि एटीएममध्ये व्यवहारही करता येऊ शकतात.
फायदे जाणून घ्या
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, IRCTC BoB RuPay कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड धारक प्रत्येक 100 रुपयांच्या खर्चासाठी 40 रिवार्ड पॉइंट्स मिळवू शकतील. हे रिवॉर्ड आयआरसीटीसी वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारे 1AC, 2AC, 3AC, CC किंवा EC बुकिंगवर उपलब्ध असतील. यासोबतच ग्राहकांना रेल्वे तिकीट बुकिंग वर 1 टक्के ट्रान्झॅक्शन फी सवलतही मिळणार आहे.
रेल्वे लाउंजला भेट देण्याची संधी
ग्राहकांनी हे नवीन क्रेडिट कार्ड जारी केल्यापासून 45 दिवसांच्या आत 1000 किमतीची एकवेळ खरेदी केल्यास त्यांना 100 बोनस रिवॉर्ड पॉइंट मिळतील. या को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड सह, तुम्ही किराणा किंवा डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये खरेदी केल्यास तुम्हाला प्रत्येक 100 रुपये खर्चासाठी 4 रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. दुसऱ्या श्रेणीमध्ये, तुम्हाला 2 रिवॉर्ड पॉइंट मिळतील. कार्डधारकांना दरवर्षी भागीदार रेल्वे लाउंजला भेट देण्याची संधी मिळेल.
रिवॉर्ड पॉइंट रिडीम करू शकता
तुम्ही देशभरातील पेट्रोल पंपांवर कार्डवरून (IRCTC BoB RuPay कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड) इंधन खरेदी केल्यास, 1 टक्के इंधन अधिभार माफी मिळेल. कार्डधारक, त्यांचा लॉयल्टी क्रमांक (को-ब्रँडेड क्रेडिट कार्डवर छापलेला) त्यांच्या IRCTC लॉगिन आयडीशी लिंक केल्यानंतर, IRCTC वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर मिळवलेले रिवॉर्ड पॉइंट रिडीम करू शकतात.
महत्वाच्या बातम्या :
- Senior Citizen Special FD Scheme : 'या' दिग्गज बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणली खास FD योजना, जाणून घ्या किती मिळणार व्याजदर
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना घेणाऱ्यांना एलआयसीचा इश्यू स्वस्त मिळणार
- Share Market : रशिया-युक्रेन वाद; शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha