Mutual Fund : या म्युच्यूअल फंडानं 1 लाखांचे केले 1 कोटी, अजूनही SIP द्वारे गुंतवणुकीची संधी
Mutual Fund : HDFC Flexi Cap Fund मध्ये 29 नोव्हेंबर 2024 पर्यंत या फंडच्या सुरुवातीपासून एखाद्यानं 1 लाखांची गुंतवणूक केली असेल तर त्याचे 1 कोटी 88 लाख झाले असते.
मुंबई : अनेक म्युच्यूअल फंडांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षांमध्ये चांगला परतावा दिल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये HDFC Flexi Cap Fund चा मसावेश आहे. ही एक ओपन एंडेड इक्विटी योजना आहे. या फंडाद्वारे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडस्ट्रीज मध्ये गुंतवणूक केली जाते. नुकतीच या फंडला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत.
एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडची सुरुवात 1 जानेवारी 1995 ला झाली होती. तेव्हापासून हा फंड गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी परतावा देण्यात फायदेशीर ठरला आहे. या फंडनं आतापर्यंत 19.13 टक्क्यांच्या सीएजीआरनं परतावा दिला आहे.
1 लाखांचे झाले 1.88 कोटी रुपये
एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडमध्ये 1 जानेवारी 1995 मध्ये ज्यानं 1 लाखांची गुंतवणूक केली आहे. त्याच्या एक लाखांची किंमत आतापर्यंत 1.88 कोटी रुपये झाली असती. सर्वात मोठी बाबत म्हणजे NIFTY 500 TRI बेंचमार्क पेक्षा 1.52 कोटी अधिक आहेत. याशिवाय जर एखाद्यानं दरमहा 10 हजार रुपांची एसआयपी केली असती तर आतापर्यंत त्यानं गुंतवलेली रक्कम 35.90 लाख रुपये असती. त्या बदल्यात त्याला मिळणारा रिटर्न 20.65 कोटी रुपये झाला असता.
फायनान्शियल एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडची गुंतवणूक अशा कंपन्यांमध्ये आहे ज्या चांगल्या परतावा देऊ शकतात. याशिवाय फंडची बॉटम अप गुंतवणूक प्रक्रिया चांगल्या कंपन्यांवर आधारित आहे ज्या चांगला मिडटर्म आणि लाँग टर्म रिटर्न देऊ शकतात.
याशिवाय एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंड कडे वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ आहे. म्हणजेच हा फंड वेगवेगळ्या सेक्टर्स आणि सेगमेंटमध्ये गुंतवणूक करतो. यामुळं जोखीम कमी होण्यास आणि स्थिर परतावा मिळण्यास मदत होते.
आकडेवारीवरुन दिसून येतं की एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडनं दीर्घ कालावाधीसाठी चांगला परतावा दिला आहे. याशिवाय वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओनं बाजारातील जोखीम कमी केली आहे. अशा प्रकारच्या फंडवर शेअर बाजारातील चढ उताराचा परिणाम होत असतो. मात्र, तुम्ही जर इक्विटीमध्ये गुंतवणूक करत असाल तर अधिक जोखीम सहन करण्याची क्षमता असली पाहिजे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
इतर बातम्या :