एक्स्प्लोर

मुंबईत स्वप्नातलं घर हवंय? म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस; जाणून घ्या अर्ज कुठे करावा

म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीत भाग घेण्यासाठी आता शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील 2030 घरांसाठी सोडत राबवली जात आहे. मुंबईत स्वप्नातलं घर खरेदी करायचं असेल तर या लॉटरीसाठी अर्ज करणे हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी 19 सप्टेंबर ही शेवटची तरीख आहे. म्हणजेच आजचा दिवस मिळून म्हाडा लॉटरीसाठी (Mumbai Mhada Lottery) अर्ज करण्यासाठी एकूण दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. याआधी ही तारीख 9 सप्टेंबर होती. मात्र म्हाडाने ही शेवटची तारीख 19 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. 

9 ऑगस्टपासून अर्ज करण्यास सुरुवात

काही दिवसांपूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईत एकूण 2030 घरांसाठी सोडत जाहीर केली होती. त्यानंतर 9 ऑगस्टपासून या सोडतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली होती. याआधी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. तसेच जुन्या तारखेप्रमाणे 13 सप्टेंबर रोजी सोडत जाहीर करण्यात येणार होती. या तारखांनुसार म्हाडाला अर्ज करण्यासाठी अवघा 26 दिवसांचा कालावधी मिळाला होता. हीच बाब लक्षात घेऊन म्हाडाने अर्ज करण्याची मुदत 19 सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्यामुळेही ही मुदतवाढ देण्यात आली होती.

कोणकोणत्या भागांत घरं?

म्हाडाच्या या सोडतीत एकूण 2030 घरं असणार आहेत. पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड या भागात ही घरे आहेत. वेगवेगळ्या उत्पन्न गटात ही घरे असणार आहेत. सोडत जाहीर झाल्यानंतर या घरांची किंमत फारच जास्त आहे, असा सूर आळवला जात होता. त्यानंतर म्हाडाने 2030 पैकी साधारण वेगवेगळ्या 370 घरांच्या किमतीत 10 ते 12 लाख रुपयांची घट केली आहे.

अर्ज भरण्याची कार्यपद्धती

सर्वप्रथम म्हाडाच्या housing.mhada.gov.in किंवा mhada.gov.in या संकेतस्थळावर जावे येथे अथवा Mobile App - Mhada Housing Lottery System वर जावे. संकेतस्थळावर जाऊ अर्जदाराने सर्वप्रथम स्वतःची नाव नोंदणी करावी व सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. नाव नोंदणीसाठी अर्जदाराने, आवश्यक ती सर्व माहिती भरणे आवश्यक आहे. तसेच बंधनकारक असलेली माहिती भरणे बंधनकारक आहे.  

हेही वाचा :

Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज कसा करायचा? नेमकी काय काळजी घ्यावी? वाचा सविस्तर माहिती

Mhada Lottery 2024: मुंबईतील 370 घरं 10 ते 12 लाखांनी स्वस्त केली, आता म्हाडा आणखी एक महत्त्वाचा निर्णय, मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा

मोठी बातमी : म्हाडाच्या 370 घरांच्या किंमतीत कपात, अत्यल्प,ते उच्च सगळ्या घरांच्या किमती उतरल्या, नव्या किमती तुमच्या बजेटमध्ये?

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget