एक्स्प्लोर

Video : स्विमिंग पूल, प्रायव्हेट स्पा अन् सिनेमागृह, भाडं तब्बल 40 लाख, मुंबईतलं 'हे' घर आहे तरी कसं?

Mumbai Luxurious Home : मुंबईतल्या या घराची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. या घरातील सुविधा तर अचंबित करणाऱ्या आहेत. तुम्हाला या घरात राहायचे असेल तर तब्बल 40 लाख रुपये भाडे द्यावे लागेल.

मुंबई : मुंबईला स्वपांनी नगरी म्हटलं जातं. या शहरात रोज अनेक तरुण-तरुणी उराशी एक स्वप्न बाळगून येतात, झगडतात. हे शहर जसं गरीब, मध्यमवर्गीयांचं आहे, तसंच श्रीमंत, अतीश्रीमंतांचंही आहे. आशिया खंडात सर्वांत श्रीमंत म्हणून ओळख असलेलं अंबानी कुटुंब याच शहरात राहतं. या शहराची श्रीमंती पाहून भल्या-भल्यांचे डोळे विस्फारतात. दरम्यान, मुंबईची हीच श्रीमंती सांगणाऱ्या अशाच एका आलिशान घराची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. या घरात तुम्हाला भाड्यानं राहायचं असेल तर त्यासाठी महिन्याला तब्बल 40 लाख रुपये मोजावे लागतील. 

घराचं भाडं तब्बल 40 लाख रुपये 

या घरात राहायचं असेल तर घरभाडं म्हणून तुम्हाला महिन्याला तब्बल 40 लाख रुपये मोजावे लागतील. मुंबईच्या लोअर परळ या महागड्या भागात हे घर आहे. या घरातून तुम्हाला मुंबईच्या किनाऱ्याचा अरबी समुद्र दिसतो. हे घर साधसुधं नसून त्यामध्ये तुम्हाला प्रायव्हेट स्वीमिंग पूल मिळेल. हे घर खरेदी करायचं असेल तर तुम्हाला एक दोन नव्हे तर तब्बल 120 कोटी रुपये मोजावे लागतील.  

120 कोटींच्या घराची विशेषता काय?

लोअर परळ या भागात असलेल्या अविघ्न इमारतीत हा ट्रिप्लेक्स पेंटहाऊस आहे. या घरात एकूण सहा बेडरुम्स आहेत. या सहा बेडरुम्समध्ये तुम्हाला सहा आलिशान बाथरुम देण्यात आलेले आहेत. तब्बल 1600 स्क्वेअर फूट परिसरात हे घर पसरलेलं आहे. या घरातून तुम्हाला पश्चिम आणि पूर्व अरबी समुद्र दिसतो. 

आलिशान घराचा व्हिडीओ :

View this post on Instagram
 
A post shared by Ravi Kewalramani (@rk.ravikewalramani)

प्रायव्हेट स्पा, स्वीमिंग पूल, प्रायव्हेट जीम

या घरात तुम्हाला आठ कार मावतील एवढी पार्किंग मिळेल. या घराचं उत्तम सजावट केलेलं इंटेरिअर आहे. घरात तुम्हाला तुमची प्रयाव्हेट लिफ्ट मिळेल. प्रायव्हेट छत, प्रायव्हेट स्वीमिंग पूल, प्रायव्हेट जीम, प्रायव्हेट पूल टेबल, प्रायव्हेट इंटरटेन्मेंट रुम, प्रायव्हेट स्पा, फॉर्मल-इन्फॉर्मल लिव्हिंग रुम तसेच संपूर्ण साहित्य असलेलं सुसज्ज किचन अशा उच्च प्रतिच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत. 

घरातील बहुसंख्य वस्तू या तंत्रज्ञानाच्या मदतीने जगातून कुठूनही कंट्रोल करता येणार आहेत. या घरात तुम्हाला वायफआय असेल. या घरात मल्टी टायर सुरक्षा सुविधा आहे. दरम्यान, मुंबईतल्या या घराची सध्या जगभरात चर्चा होत आहे. 

हेही वाचा :

तब्बल 90 शेअर्स पुढच्या पाच दिवसांत होणार एक्स-डिव्हिडेंड, गुंतवणूकदारांनो पैसे कमवायची संधी सोडू नका!

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' होऊ शकते श्रीमंत, 1500 गुंतवून मिळू शकतील सव्वा लाख रुपये; जाणून घ्या नेमकं कसं?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील बदललेला 'हा' नियम माहिती आहे का? तुमच्या फायद्याचा की तोट्याचा, जाणून घ्या!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं

व्हिडीओ

Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report
Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
Eknath Shinde: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांनी दिली ऑफर, कितीला विकत घेता?
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांनी दिली ऑफर, कितीला विकत घेता?
Embed widget