उद्योगपती मुकेश अंबानींची दररोजची कमाई किती? एकूण तुम्हाला धक्काच बसेल, जाणून घ्या सविस्तर माहिती
उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani ) हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते दररोज किती कमवतात याची माहिती पाहुयात.

Mukesh Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Reliance Industries Limited) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani ) हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 19 एप्रिल रोजी त्यांनी त्यांचा 68 वा वाढदिवस साजरा केला. 19 एप्रिल 1957 रोजी येमेनमध्ये धीरुभाई अंबानी आणि कोकिलाबेन अंबानी यांच्या पोटी जन्मलेले मुकेश अंबानी यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते. फोर्ब्सच्या अहवालानुसार मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 96.7 अब्ज डॉलर आहे.
मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत गेल्या 10 वर्षात प्रचंड वाढ झाली आहे. 2020 मध्ये ते 36 अब्ज डॉलरवरुन 2024 पर्यंत त्यांची संपत्ती 114 अब्ज डॉलर झाली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये मुकेश अंबानी यांचा 18 वा क्रमांक लागतो. अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांनी अल्पावधीत सर्वाधिक ग्राहकांना आकर्षित करुन रिलायन्सच्या डिजिटल सेवा व्यवसाय जिओसाठी जागतिक विक्रम केला आहे. जगातील सर्वात मोठ्या 4G ब्रॉडबँड वायरलेस नेटवर्कपैकी एक तयार करण्याचे श्रेय देखील त्यांना जाते. या माध्यमातून शिक्षणापासून आरोग्यसेवा, आर्थिक सेवा, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रात डिजिटल सेवेची मदत झाली.
2024 मध्ये मालमत्तेत घट
मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत गेल्या दशकात लक्षणीय वाढ झाली आहे. ते 2020 मध्ये सुमारे 36 अब्ज डॉलरपासून सुरु झालेली वाटचाल 2024 पर्यंत 114 अब्ज डॉलरपेक्षा जास्त वाढली आहे. रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या जलद विस्तारामुळं या वाढीला चालना मिळाली आहे. आज, जिओचे देशभरात 450 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. रिलायन्स रिटेलने देखील जगातील सर्वात मोठ्या रिटेल कंपन्यांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. डिसेंबर 2024 मध्ये रिलायन्सच्या स्टॉक व्हॅल्यूमध्ये झालेल्या घसरणीमुळं मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत सुमारे 96.7 अब्ज डॉलरची घट झाली आहे.
मुकेश अंबानींची दररोजची कमाई किती?
मुकेश अंबानी दररोज 163 कोटी रुपये कमावतात. दूरसंचार, पेट्रोकेमिकल, तेल, किरकोळ अशा विविध क्षेत्रांमध्ये पसरलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कंपन्यांमधून तो हे उत्पन्न मिळवतो. त्याच्याकडे एवढी संपत्ती आहे की एखाद्या भारतीयाने वार्षिक 4 लाख रुपये कमावले तरी अंबानींइतकी संपत्ती मिळवण्यासाठी त्याला 1.74 कोटी वर्षे लागतील, जे अशक्य आहे.
मुकेश अंबानी देखील अतिशय आलिशान जीवनशैली जगतात. ते मुंबईतील त्याच्या आलिशान घर अँटिलियामध्ये राहतात. या घराची किंमत 15,000 कोटी रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या:























