Just Dial ची मालकी मुकेश अंबानींकडे येणार? 6500 कोटींना व्यवहार होण्याची शक्यता
रिलायन्स इन्डस्ट्रिजचे (Reliance Industries ) सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) जस्ट डायल (Just Dial) खरेदी करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
नवी दिल्ली : रिलायन्स इन्डस्ट्रिजचे (Reliance Industries) सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) जस्ट डायल (Just Dial) खरेदी करण्याची चर्चा सध्या सुरू आहे. हा व्यवहार 80 ते कोटी डॉलर म्हणजे 5920 कोटी ते 6660 कोटी रुपयांना होण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 16 जुलैला जस्ट डायलने या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी एका बोर्ड मीटिंगचे आयोजन केले आहे. 25 वर्ष जुनी असलेली इन्फॉर्मेशन सर्च अॅन्ड लिस्टिंग कंपनी जस्ट डायलचे (Just Dial) संपूर्ण देशात जाळे आहे.
जर हा व्यवहार झाला तर रिलायन्स रिटेलला जस्ट डायलच्या मर्चंट डाटाबेसचा फायदा मिळणार आहे. ज्यामुळे रिलायन्स कंपनी लोकल कॉमर्स आणि पेमेंट्समध्ये इतर कंपन्यांच्या तुलनेत वरचढ ठरेल. जस्ट डायल लोकल सर्च इंजिन सेंगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे. जस्ट डायलच्या मोबाईल अॅप, वेबसाईट आणि 8888888888 टेलीफोन हॉटलाईनला तीन महिन्याला 15 कोटीपेक्षाही जास्त व्हिजीटर्स आहेत.
कंपनीत प्रेमोटर वी.एस.एस. मणी आणि त्यांच्या परिवाराची 35.5 टक्के भागीदारी आहे. सध्या त्याची किंमत 2387.9 कोटी रुपये आहे. आता रिलायन्स सध्या मणींकडून आंशिक हिस्सेदारी खरेदी करण्याची योजना करता आहे. एवढेच नाही तर 26 टक्के अतिरिक्त भागीदारी ओपन ऑफरच्या माध्यमातून आणता येईल. जर ही ओपन ऑफर पूर्णपणे सब्सक्राईब झाली तर रिलाईन्सकडे 60 टक्क्यांपेक्षा अधिक भागीदारी असेल आणि मणी ज्यूनिअर पार्टनर म्हणून कंपनीचे कामकाज सांभाळतील.
आज बीएसईवर रिलायन्सचा शेअर आज 2.75 अंकांनी कोसळून 2083.25 वर बंद झाला गेल्या सहा महिन्यांपासून जस्टडाईलचे शेअर ५२.४ टक्क्यांनी वाढले आहे. आज जस्टडाईलच्या शेअरमध्ये 26.85 अंकाची वाढ होत 1107.00 अंकावर बंद झाला. सध्या रिलायन्सचे भांडवल 13, 20, 664. 49 कोटी रुपये तर जस्टडाईलचे 6, 893.60 कोटी रुपये भांडवल आहे.