एक्स्प्लोर

Jio Platforms : गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपणार, जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ येणार, मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, 27 कोटी शेअर जारी करणार

Mukesh Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएममध्ये मुकेश अंबानी यांनी जिओच्या आयपीओ संदर्भात मोठी घोषणा केली आहे. जिओचा आयपीओ भारतीय बाजारातील सर्वात मोठा आयपीओ असेल.

मुंबई : मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 49 व्या एजीएममध्ये जिओच्या आयपीओबाबत मोठी घोषणा केली आहे. बाजार जानकारांच्या मते जिओचा आयपीओ भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठा आयपीओ असेल. मुकेश अंबानी म्हणाले की  'Jio Platforms च्या संचालक मंडळानं DRHP ला मंजुरी दिली आहे. आजच ते सेबीकडे फाईल केलं जाईल. हा माझ्यासाठी आणि रिलायन्स कुटुंबासाठी, शेअरधारकांसाठी भावनिक क्षण आहे.  

रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सच्या बोर्डानं आयपीओसाठी सेबीकडे फाईल केल्या जाणाऱ्या डीआरएचपीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार  10 रुपये दर्शनी किंमत असलेले 27 कोटी शेअर जारी केले जातील. इश्यू प्राइस नंतर निश्चित केली जाणार आहे.  

मुकेश अंबानी म्हणाले की  आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी Jio IPO प्रक्रियेच नेतृत्त्व करत आहेत. ते पुढे म्हणाले की Jio ची प्रस्तावित लिस्टिंग भारत जागतिक क्षमता, जागतिक पातळी, जागतिक मूल्य असलेली तंत्रज्ञान कंपनी भारत बनवू शकतो हे जगाला दाखवून देईल. मुकेश अंबानी पुढे म्हणाले की तुम्हाला आणि गुंतवणूकदारांना विश्वास देतो की जिओचं भविष्य शानदार असेल. 

आकाश अंबानी काय म्हणाले?

रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे चेअरमन आणि जिओ प्लॅटफॉर्म्सचे व्यवस्थापकीय संचालक आकाश अंबानी यांनी त्यांच्या संबोधनात म्हटलं की जिओचा यूजरबेस 524 दशलक्ष सबस्क्रायबर्सच्या पुढं गेला आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम ऑपरेटर आहे. जीओचा 5G सबस्क्रायबर बेस 268 दशलक्षच्या पुढे पोहोचला आहे. आकाश अंबानी म्हणाले की Jio Platforms ची FY26 मध्ये 1,46,885 कोटी रुपयांची उलाढाल होती. वार्षिक आधारावर ती 14.6 टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीचा नफा 30 हजार कोटींच्या पुढे पोहोचला आहे. वार्षिक आधारावर त्यात 15.1 टक्के ग्रोथ झाली आहे. सॅटेलाईट कनेक्टिव्हीटीसाठी ग्राऊंड स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर उभारणी सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं.  

जिओच्या आयपीओच्या माध्यमातून पूर्णपणे नवे शेअर जारी केले जातील. यातून मिळणारी रक्कम जिओच्या 5G नेटवर्क विस्तार, एआय तंत्रज्ञान, डिजीटल इन्फ्रास्ट्रक्चरला मजबूत करण्यासाठी वापरली जाईल. लिस्टिंगवेळी जिओ प्लॅटफॉर्म्सचं मार्केटकॅप 110 ते 130 अब्ज अमेरिकन डॉलर्स असू शकतं.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Embed widget