Mukesh Ambani : फेडीन पांग सारे... ज्या कॉलेजात शिकले, त्या कॉलेजला मुकेश अंबानींची 'गुरू दक्षिणा', 'इतक्या' कोटींची देणगी
Mukesh Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी मुंबईतील एका कॉलेजला 151 कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली आहे.

Mukesh Ambani ICT Donation मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मोठी घोषणा केली आहे. मुकेश अंबानी यांनी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबईला (Institute of Chemial Technology, Mumbai) 151 कोटी रुपयांची देणगी कोणत्याही अटीशिवाय देणार असल्याची घोषणा केली आहे. 1970 च्या दशकात मुकेश अंबानी यांनी या संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं होतं. मुकेश अंबानी यांनी आयसीटीमध्ये एका कार्यक्रमात ही घोषणा केली. मुकेश अंबानी यांचे गुरु प्रा. एसएम शर्मा यांचं चरित्र 'डिवाईन सायंटिस्ट' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. मुकेश अंबानी या संस्थेत कार्यक्रमानिमित्त तीन तास थांबले होते. या ठिकाणी जुन्या आठवणी त्यांनी ताज्या केल्या.
मुंबईतील माटुंगा येखील आयसीटी संस्थेला यापूर्वी यूनिवर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल नावानं ओळखलं जायचं. मुकेश अंबानी यांनी या कार्यकर्मात प्रा. शर्मा यांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. प्रा.एसएम शर्मा यांचं पहिलं लेक्चर त्यांना प्रेरणा देतं. प्रा. शर्मा यांनी केवळ शिकवलं नाही तर भारताचं आर्थिक धोरण बदलण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
मुकेश अंबानी यांनी प्रा. शर्मा यांना राष्ट्र गुरु असं संबोधलं. ते म्हणाले की धोरण कर्त्यांना भारताच्या प्रगतीसाठी लायसन्स आणि परमीट राजमधून मुक्ती आवश्यक असल्याचं शर्मा यांनी सांगितलं. यामुळं भारतीय उद्योगांना मोठं होण्यासाठी, आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची संधी मिळाली. मुकेश अंबानी यांनी प्रा. एसएम शर्मा यांची आणि रिलायन्सचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांची तुलना केली. दोघांमध्ये भारतीय उद्योगानं जगाचं नेतृत्व करावं असं वाटायचं. विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यासह खासगी उद्योगतेच्या एकत्रीकरणामुळं समृद्धीची दारं खुली होतील, असं अंबानी म्हणाले.
मुकेश अंबानी यांनी भारतातील रासायनिक उद्योगाच्या विकासाचं श्रेय प्रा. एस.एम. शर्मा यांना दिलं. प्रा. शर्मा यांच्या मार्गदर्शनात या रासायनिक उद्योगानं नवं क्षितिज गाठलंय. गुरुदक्षिणेच्या स्वरुपात प्रा. शर्मा यांच्या सूचनेनुसार मुकेश अंबानी यांनी आयसीटीला 151 कोटी रुपयांची देण्याची घोषणा केली.
मुकेश अंबानी यांनी म्हटलं की प्रा. शर्मा जेव्हा काय सांगतात तेव्हा आम्ही फक्त ऐकतो, विचार करत नाही. मला त्यांनी सांगितलं की आयसीटीसाठी काही मोठं करायचं आहे, आता मला ती घोषणा करताना आनंद होत आहे, असं मुकेश अंबानी म्हणाले. यामुळं आयसीटीला संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
























