Stock Market : संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या स्टॉकनं पैशांचा पाऊस पाडला, गेल्या 5 महिन्यात गुंतवणूकदार मालामाल
Defence Stock:पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. गेल्या पाच महिन्यात निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्समध्ये 40 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे.

Defence Stock:निफ्टी इंडिया डिफेन्स क्षेत्रातील कंपन्यांनी यंदा चागंली कामगिरी केली आहे. गेल्य पाच महिन्यात जवळपास 40 टक्क्यांची तेजी आली आहे. निफ्टी 50 मध्ये केवळ 5 टक्क्यांची तेजी दिसून आलीय.ETMarkets च्या एका रिपोर्टनुसार निफ्टी डिफेन्स निर्देशांकातील सात संरक्षण क्षेत्रातील स्टॉकच्या किमंतीमध्ये 50 ते 100 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे.
Garden Reach Shipbuilders & Engineers
गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सच्या शेअरमध्ये या वर्षी 111 टक्क्यांपर्यंत तेजी पाहायला मिळाली. या कंपनीचा स्टॉक 1616 रुपयांवरुन 3406 रुपयांवर पोहोचला आहे. 6 जूनला या स्टॉकमध्ये 4.69 टक्क्यांची घसरण झाली. सध्या हा शेअर 3246.90 रुपयांवर आहे. मात्र, एका महिन्यात या कंपनीचा स्टॉक 77.20 टक्क्यांनी वाढला आहे.
Bharat Dynamics
भारत डायनामिक्स कंपनीच्या स्टॉकमध्ये या वर्षात 75 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. 1123 रुपयांवरुन स्टॉक 1969 रुपयांवर पोहोचला आहे. दारु गोळा आणि मिसाईल सिस्टीम बनवणाऱ्या डिफेन्स क्षेत्रातील सरकारी कंपनीनं गेल्या पाच वर्षात 1613 टक्के रिटर्न दिला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या शेअरमध्ये 38 टक्के तेजी आली आहे.
Solar Industries India
सोलर इंडस्ट्रीज इंडियाच्या शेअरमध्ये जोरदार तेजी आली आहे. हा शेअर 74 टक्क्यांनी वाढला असून या वर्षात 9783 वरुन 17023 रुपयांवर पोहोचला होता. सध्या हा शेअर 16523 वर आहे.
Astra Microwave Products
एस्ट्रा मायक्रोवेव प्रोडक्टसच्या शेअरमध्ये 2025 मध्ये 54 टक्के तेजी आली आहे 768 रुपयांवरुन स्टॉक 1179 रुपयांवर पोहोचला आहे. 6 जूनला कंपनीचा शेअर 4.12 टक्क्यांनी घसरुन 1130 रुपयांवर आला आहे.
Cochin Shipyard
कोचीन शिपयार्डच्या शेअरमध्ये देखील 53 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे. हा स्टॉक 1539 रुपयांवरुन 2351 रुपयांवर पोहोचला आहे. ही संरक्षण क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. या स्टॉकमध्ये 8 टक्क्यांची तेजी शुक्रवारी पाहायला मिळाली. गेल्या 15 ट्रेड सेशनपैकी 10 वेळा कोचीन शिपयार्डच्या स्टॉकमध्ये तेजी दिसून आली आहे.
Paras Defence And Space Technologies
जानेवारी 2025 पासून या स्टॉकमध्ये 71 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. 1008 वरुन हा स्टॉक 1725 रुपयांवर पोहोचला आहे.
Mazagon Dock Shipbuilders
माझगांव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअरमध्ये 54 टक्क्यांची तेजी आली आहे. 2228 रुपयांवरुन हा स्टॉक 3430 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवारी (6 जून) या कंपनीचा स्टॉक 3383.50 रुपयांवर बंद झाला.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

























