Donald Trump Elon Musk : डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यात शस्त्रसंधी, मस्क यांच्याकडून ती पोस्ट डिलीट
Donald Trump Elon Musk : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योजक एलन मस्क यांच्यातील वाद मिटण्याचे संकेत मिळत आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांच्याकडून त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे संकेत मिळत आहेत. एलन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात एपस्टीन फाईल्सबाबत केलेली पोस्ट आणि इतर पोस्ट डिलीट केल्या आहेत. एलन मस्क यांनी ट्रम्प यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या अन्य पोस्ट देखील डिलीट केल्यात.
एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सार्वजनिकरित्या वादावादी झाली होती. जेफरी एपस्टीन याचा एक संदर्भ समोर आल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या. जेफरी एपस्टीन हा एक लैंगिक अत्याचारातील गुन्हेगार होता. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी आरोप केला की या प्रकरणाशी संदर्भातील काही फाईल्स सार्वजनिक करण्यात आल्या नव्हत्या. कारण, त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव होतं. आता मस्क यांनी त्या पोस्ट हटवल्या आहेत.
पोलिटिकोच्या एका रिपोर्टनुसार, व्हाईट हाऊसमधील काही लोक डोनाल्ड ट्रम्प यांनी एलन मस्क यांच्यावरील सार्वजनिक टीका कमी करावी यासाठी प्रयत्न करत आहेत.
माझ्याशिवाय डोनाल्ड ट्रम्प निवडणूक हारले असते, डेमोक्रेटसनं सभागृहावर नियंत्रण मिळवलं असतं. सिनेटमध्ये रिपब्लिकन 51-49 असते. मस्क यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर म्हटलं की, मला या संदर्भात कोणतीही आपत्ती नाही की एलन मस्क माझ्या विरोधात गेले आहेत. त्यांनी हे काही महिन्यांपूर्वीच करायला पाहिजे होतं, असं ट्रम्प म्हणाले होते.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या काळात एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांची मैत्री वाढल्याचं दिसून आलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यानंतर मस्क यांच्याकडे DOGE ची जबाबदारी दिली होती. मस्क डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅबिनेट बैठकांमध्ये सहभागी झाले होते. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या शपथविदी सोहळ्याला देखील उपस्थित होते. एलन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी DOGE तून बाहेर पडण्याची घोषणा केली होती.
BREAKING: Elon Musk just deleted this post: pic.twitter.com/FOoLEDe5fs
— Brian Krassenstein (@krassenstein) June 7, 2025
मस्क यांच्याकडून पोस्ट डिलीट, विरोधक आक्रमक
मस्क यांच्याकडून पोस्ट डिलीट करण्यात आल्या असल्या तरी यावरुन निर्माण झालेला वाद कायम आहे. डेमोक्रेटिक नेत्यांकडून न्याय विभागाला आणि एपबीआयला एपस्टीन संदर्भातील फाईल्स सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या फाईलमध्ये सरकारी सध्याच्या किंवा यापूर्वीच्या सरकारी अधिकाऱ्याचं नाव असू शकतं आणि ते जनतेला कळलं पाहिजे, तो हक्क आहे, अशी भूमिका मांडली. मात्र, एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी मस्क आणि ट्रम्प वादावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.
Before You Go
Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला






















